• Tue. Apr 29th, 2025

लातूर जिल्हा बँकेकडून ठेवीदारांसाठी व्याजदरात भरघोस वाढ १ फेब्रुवारी पासून नविन निर्णय लागू

Byjantaadmin

Jan 28, 2023

लातूर जिल्हा बँकेकडून ठेवीदारांसाठी व्याजदरात भरघोस वाढ १ फेब्रुवारी पासून नविन निर्णय लागू

जेष्ठ नागरिकाना १ % जास्त व्याज मिळणार

वैयक्तिक, प्राथमिक संस्था, ठेवीदारांना मिळणार लाभ

लातूर :-लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मातृत्व संस्था असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ठेवीदारांना घसघशीत व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला असून राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे त्यामुळे जिल्ह्यातील बँकेच्या ठेवीदाराना मोठा दिलासा मिळाला आहे या निर्णयामुळे जिल्हा बँकेच्या सर्व ठेवीदारांना नविन वर्षाच्या सुरवातीला ही मिळालेली गिफ्ट आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही संचालक मंडळाच्या बैठकीला बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव संचालक अँड श्रीपतराव काकडे, पृथ्वीराज शिरसाठ, एन आर पाटील, अँड राजकुमार पाटील, व्यंकटराव बिरादार, भगवानराव पाटील तळेगावकर, अशोकराव गोविंदपूरकर, जयेश माने, दिलिप पाटील नागराळकर, मारोती पांडे, अनुप शेळके,संचालिका सौ स्वयंप्रभा पाटील, श्रीमती लक्ष्मीताई भोसले, सौ सपना किसवे, कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव विविध खाते प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती

*ठेवीदारांना मिळणारं फेब्रुवारीपासून नविन व्याजदर*

जिल्हा बँकेचे सध्याचे ठेवीदारांना व्याज खालील प्रमाणे आहेत तर कंसातील आकडे वाढीव व्याज दराचे आहेत अनुक्रमांक (१) ७ ते १४ दिवसासाठी पूर्वी ३.५० होते आता (४ टक्के) (२) १५ ते २९ दिवसासाठी ३.५० (४ %) (३)३० ते ४५ दिवसासाठी ३.५० टक्के (४%) (४) ४६ ते ९० दिवसासाठी ४% (४.५०) (५) ९१ ते १८० दिवस ४.५० (५ %) (६) १८१ ते एक वर्षाच्या आत ५.५० (६%) (७) एक वर्षासाठी ६%(७%) (८) १ वर्षाच्या वर ते दोन वर्षापर्यंत ६% (७.२५) (९)२ वर्षाच्या वर ते ३ वर्षापर्यंत ५.५० (७.५०) (१०) ३ वर्षाच्या वर ते ५ वर्षापर्यंत ५.५० ( ७.५०) (११) ५वर्षाच्या वर ते ८ वर्षापर्यंत ५.५० (७.५०) (१२) ८ वर्षाच्या वर ते दहा वर्ष ५.५०(७.५०) अशी घसघशीत ठेवीदारांना नविन वाढ मिळणार असून यात जेष्ठ नागरिकाना १% व्याज जास्तीचे देणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे.

नवीन व्याज दराचा ग्राहकांनी लाभ घ्यावा
चेअरमन तथा आमदार धीरज देशमुख यांचे आवाहन

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने फेब्रुवारी २०२३ पासून ठेवीदारांना ०.५०% ते २ टक्क्या पर्यंत व्याज दरात वाढ केली आहे या नवीन व्याज दराचा ग्राहकांनी फायदा घ्यावा आपल्या ठेवी जिल्हा बँकेत ठेवाव्यात असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed