_औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023_
लातूर जिल्ह्यात सोमवारी मद्यविक्री राहणार बंद
लातूर, दि. 28 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या 05- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार सोमवार, 30 जानेवारी रोजी मतदान होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात 28 जानेवारी रोजी दुपारी चारपासून ते 29 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, या आदेशांमध्ये बदल करून आता 30 जानेवारी 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले आहेत.
या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या 30 जानेवारी 2023 रोजी संपूर्ण दिवस बंद राहतील. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकाविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अन्वये कडक कार्यवाही करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.