भारतीय हवाई दलासाठी शनिवार अक्षरश: घातवार ठरला. राजस्थानच्या भरतपूरमध्ये एक चार्टर्ड विमान कोसळले. दुसरीकडे मध्य प्रदेशात सुखोई-30 आणि मिराज-2000 विमान कोसळले.
राजस्थानमध्ये (Rajasthan, Bharatpur) अपघात झालेल्या विमानाने आग्र्यातून उड्डाण केले होते, तर मध्य प्रदेशात अपघात झालेल्या दोन विमानांनी ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले होते. शनिवारी सकाळी सकाळी तिन्ही विमानांचे अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली. एकाच दिवशी तीन विमानांचा अपघात झाल्यानंतर हवाई दलाने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत. राजनाथ सिंह यांनी सीडीएस अनिल चौहान आणि हवाई दलाचे प्रमुख व्ही. आर. चौधरी अपघाताची माहिती मागवली आहे.