निलंगा येथील शिवाजीनगर भागातील रेशन दुकान नंबर 12 या दुकानदाराच्या त्रासाला कंटाळून उपविभागीय कार्यालय निलंगा येथे निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये दुकानदाराच्या होणाऱ्या मुजोरीपणामुळे शिवाजीनगर निलंगा येथील गोरगरीब जनतेला खूप त्रास सहन करावा लागत आहे.
प्रत्येक कार्डधारका मागे कमीत कमी 5 ते 10 किलो आणि जास्तीत जास्त
20किलो पर्यंत रेशन कमी देत आहे पावती मागितली असता मशीन खराब आहे असे उत्तर मिळते विचारणा केली असता माझे काही वाकडे होत नाही तुम्ही तहसीलदार,आमदार,कलेक्टर कुठेही जावा काही फरक पडणार नाही मला रेशनिंग माल वरूनच कमी येत आहे असे सांगत आहे आणि तेथे ठेवलेला माणूस महिला वर्गाला खूप खालच्या पातळीवर भाषा करत आहे आणि गुंड प्रवृत्तीच्या वागणूक करतो या त्रासाला कंटाळून पुरवठा विभाग निलंगा येथे कमीत कमी 50 वेळा 400 लोकांच्या सह्यासहित तक्रार करून देखील कोणताही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही त्यामुळे उपविभागीय कार्यालय निलंगा येथे निवेदन देऊन दुकान रद्द करून दुसरे दुकान देण्यात यावे अन्यथा येणारा काळात तीव्र आंदोलन करून उपोषणाला देखील बसण्यात येईल असे त्या निवेदनामध्ये नमूद केले आहे यावेळी उपस्थित ख़दीर मासुलदार, गजानन सूर्यवंशी कृष्णा कांबळे ,सय्यद महफूज विजयकुमार पाटील, राजकुमार माधवराव सूर्यवंशी,शोभाबाई शाम कांबळे,यशोदा कांबळे,परमेश्वर बब्रुवान कांबळे,बालाजी गणपतराव महालिंगे,चंद्रकला दिगंबरे,शांताबाई मुगळे आदी उपस्थित होते.
रेशन दुकानदार बदलण्याची मागणी:अनेक वर्षांपासून दुकानदार देत आहे त्रास
