निलंग्यात भाजपाचे अजित पवार यांना जोडेमारो आंदोलन
निलंगा;-छञपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आवमानकारक वक्तव्य करणाऱ्या विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या प्रतिमेला निलंगा भाजपाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करून जाहीर निषेध
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या अजित पवार यांचा निषेध करत निलंगा भारतीय जनता पार्टीच्या वतीने येथील छञपती शिवाजी महाराज चौकात अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे, जिल्हाउध्यक्ष शेषराव ममाळे, जिल्हा संघटन चिटणीस संजय दोरवे, जिल्हा संघटन सरचिटणीस युमो तानाजी बिराजदार, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष तम्मा माडिबोणे, माजी नगरसेवक प्रदिप पाटील, युवा मोर्चा उपध्यक्ष नागेश पाटील, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष सुमित ईनानी, शफीक सौदागर, अजित जाधव, सचिन गायकवाड,माधव पटणे,खदीर मासुलदार, ज्ञानेश्वर भोसले, पदाधिकारी व कार्यकर्ते या जोडेमारो आंदोलनात सहभागी उपस्थित होते.