माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार गंजगोलाई ते खंडापूर बंद झालेली सिटीबस पूर्ववत सुरू
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सिटी बसला हिरवा झेंडा दाखवून केले मार्गस्थ
लातूर प्रतिनिधी :राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार गंजगोलाई ते खंडापूर बंद झालेली सिटीबस गुरूवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सेवा पूर्ववत करण्यात आली. लातूर शहरानजीकच्या खंडापूर येथून लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, ट्वेंटीवन शुगर कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख विलास सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक संजय पाटील खंडापूरकर यांनी या सिटी बसला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले, ही बस सेवा सुरू झाल्याने खंडापूर परिसरातील नागरिकांमध्ये व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी खंडापूरचे सरपंच कुमार पाटील खंडापूरकर, उपसरपंच जगन्नाथ कैले ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नारायण कैले, खंडापूर विविध सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन पंडित लखनगिरे, बब्रुवान आतकळे, राम पाटील, नवनाथ चामे ,कृष्णा कैले, गहिनीनाथ सुडे, वसंत जाधव, अंकुश गायकवाड, दमयंती गिरी, राजकन्या कैले, वलसे मॅडम, जाधव मॅडम, ग्रामसेवक के .बी दुधाटे, महेश वलसे, हनमंत ढोरमारे, राजकुमार साळुंखे, दयानंद जाधव, शेखर पाटील, संदिपान दरवडे, महेश कुलकर्णी आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी खंडापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.