रायगड:-शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचे कळत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या रश्मी ठाकरे यांच्या विरोधात रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
रेवदंडा पोलिस ठाण्यात ठाकरे आणि वायकर परिवारावर आयपीसी भारतीय दंड संहिता कलम 415, 420, 467, 468, 471 अंतर्गत अन्वये तक्रार दाखल केली आहे. इंडियन पिनल कोड मधील 34 आणि ग्रामपंचायत रेकॉर्डच्या तरतुदीनुसार ग्रामपंचायतीची नोंद खोटी करणे आणि ग्रामपंचायतीमध्ये बेकायदेशीर कृत्य करणे. त्यानुसार त्यांच्यावर वरीलप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी डॉ. किरीट सोमैया यांनी केली आहे.
इंडियन पिनल कोड मधील 34 आणि ग्रामपंचायत रेकॉर्डच्या तरतुदीनुसार ग्रामपंचायतीची नोंद खोटी करणे आणि ग्रामपंचायतीमध्ये बेकायदेशीर कृत्ये करणे. त्यानुसार त्यांच्यावर वरीलप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी डॉ किरीट सोमैया यांनी केली आहे
किरीट सोमय्या यांनी 1 जानेवारीला आपण रेवदंडा पोलिस स्टेशनमध्ये ठाकरे आणि वायकर यांचा कोर्लई अलिबागच्या ’19 बंगल्यांच्या घोटाळा’ प्रकरणी तक्रार करण्यासाठी जाणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते.
नेमकी काय आहे तक्रार?
किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे, अन्वय नाईकांनी 2009 मध्ये ग्रामपंचायतीच्या परवानगीने 19 बंगले बांधले होते. त्यांनी दरवर्षी (2009, 2010, 2011, 2012, 2013) नियमीतपणे ग्रामपंचायतीला घरपट्टी भरणा केली. 2014 मध्ये ठाकरे व वायकर परिवाराने अन्वय नाईकांकडून सदर जमिनी बंगल्यांसह स्वतःच्या नावे विकत घेतले.
ठाकरे परिवाराने या 19 बंगल्यांसाठी 2013 ते 2021 या 8 वर्षांची घरपट्टी भरली. 11 नोव्हेंबर 2020 रोजी घोटाळा उघडकीस आणला. त्यानंतर ठाकरे सरकार, मुख्यमंत्री कार्यालयाने अलिबाग, रायगड जिल्ह्यातील शासकीय अधिकार्यांवर दबाव आणून या 19 बंगल्यांच्या नोंदी शासकीय दस्तऐवजांमधून काढून टाकल्या.
रश्मी ठाकरे यांच्या या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी. ज्याप्रमाणे अनिल परब यांच्या रिसॉर्टची चौकशी झाली आणि कारवाई करण्यात आली. तशीच कारवाई रश्मी ठाकरे यांच्या विरोधात करण्यात यावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.