जिल्हाधिकारी यांचे आदेशाला बगल देत दुय्यम निबंधकांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न.
जिल्हाधिकारी यांचे आदेशानंतरही निलंगा दुय्यम निबंधकाच्या चौकशी कामी दोन महिन्यानंतरही दिरंगाई..
निलंगा (प्रतीनीधी):-निलंगा तालुक्यातील अनेक गावांतील प्लॉटिंगचे बेकायदेशीर खरेदी विक्री व्यवहार निलंगा येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या माध्यमातून होत आसल्याची तक्रार करुन दोन महीने झाले आणी या विषयी चौकशी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी निलंगा व सह जिल्हा निबंधक वर्ग-१ लातूर यांना चौकशी करण्याचे आदेश देऊन दोन महिने झाले तरी अद्यापही चौकशी अहवाल गुलदस्त्यात.
याविषयी सविस्तर माहिती अशी की , मागील जवळपास एक वर्षामध्ये अनेक बेकायदेशीर खरेदी-विक्री नोंद झाल्याची पुराव्यानिशी तक्रार जिल्हा अधिकारी कार्यालय यांचेकडे औराद येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते अमोल ढोरसिंगे यांनी केलेली होती त्यामध्ये दिनांक १९ आक्टोंबर २०२२ रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयाने एक पत्र उपविभागीय अधिकारी , निलंगा व दुसरे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ यांना चौकशी करुन अहवाल देण्यासाठी आदेश केलेले असतानाही निलंगा उपविभागीय अधिकारी कार्यालयाने मात्र दोन महिन्यानंतरही जिल्हा अधिकारी यांचे आदेशानुसार काहीच कार्यवाही केल्याचे पत्र तक्रारदार यांना दिलेले नाही त्यामुळे काय चौकशी झाली याची काहीच माहिती मिळत नाही तसेच काही चौकशी झाली किंवा नाही हेही कळत नाही आणी तक्रारदार यांनी जवळपास तीन वेळा उपविभागीय अधिकारी डॉ. शोभा जाधव यांची भेटही घेतली पण चौकशी सुरु असल्याचे फक्त तोंडी उत्तर देण्यात आले पण दोन महिन्यानंतरही कसलीच चौकशी कार्यवाही झालेली दिसुन आली नाही.
याविषयी दुसरे चौकशी अधिकारी यांनी सुनावणी घेऊन दुय्यम निबंधक व तक्रार यांना पुरावे दाखल करण्याचे कळविले व लिखीत दुय्यम निबंधक यांना स्वंयस्पष्ट अहवाल मागविण्यात आला पण त्यावर सुध्दा पंचवीस दिवसांपासून काहीच उत्तर मिळालेले नाही त्यामुळे जिल्हाधिकारी यांचे आदेशानंतरही या दोन्ही अधिकारी यांचेकडुन दुय्यम निबंधक यांना पाठीशी घालण्याचे प्रकार सुरु आसल्याचेही दिसत आहे. त्यामुळे या दोन्ही वरीष्ठ अधिकारी यांनी जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट दिसत आहे.