ओल्या दुष्काळासाठी काँग्रेस सज्ज शेतकऱ्यांसाठी स्वस्थ बसणार नाही -आमदार अमित देशमुख
अतिवृष्टी आढावा बैठक संपन्न्
लातूर प्रतिनिधी, शनिवार, ४ ऑक्टोबर २०२५:
मराठवाडासह लातूर जिल्हयात अतीवृष्टीने संपूर्ण खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. लातूर
जिल्ह्यात तर सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. सत्ताधाऱ्यांनी जनतेवर
खूप अन्याय केला असून, काँग्रेस पदाधिकाऱ्यांशिवाय शेतकऱ्यांच्या बांधावर इतर कोणीही गेलेले नाही.
संकटकाळात काँग्रेस पक्ष सामान्य माणसाच्या मदतीसाठी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास व्यक्त
करुन जोपर्यंत शासनाची मदत शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसाठी लढा देणार
आहे, असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आणि महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस
पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.
लातूर जिल्हा काँग्रेस निरीक्षकांची अतिवृष्टी आढावा बैठक शुक्रवार, ३ ऑक्टोबर रोजी लातूर
शहरातील काँग्रेस भवन येथे संपन्न झाली. या बैठकीत आमदार देशमुख यांनी जिल्ह्यात नेमलेल्या पक्ष
निरीक्षकांकडून ६२ महसूल मंडळांतील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला
यावेळी ते बोलत होते.
यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे
अध्यक्ष किरण जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख, रेना सहकारी साखर कारखान्याचे
चेअरमन अनंतराव देशमुख, व्हा. चेअरमन प्रवीण पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव
कल्याण पाटील, सचिव समद पटेल, माजी नगराध्यक्ष हमीद शेख,माजी चेअरमन सर्जेराव मोरे, माजी
व्हा. चेअरमन रवींद्र काळे, नारायण लोखंडे, चंद्रकांत मद्दे, ट्वेंटीवन शुगरचे व्हा. चेअरमन विजय
देशमुख, डॉ.दिनेश नवगिरे, डॉ. अरविंद भातांब्रे, लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष घोडके, श्री
संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सचिन पाटील, प्रवीण
सूर्यवंशी, प्रा. प्रवीण कांबळे, शरद देशमुख आदीसह लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे ६२ मंडळाचे निरीक्षक
उपस्थित होते.
पंचनामे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार
यावेळी बोलताना आमदार अमित देशमुख म्हणाले की, जोपर्यंत शासनाची मदत शेतकऱ्यांना
मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसाठी लढा देणार आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीने नेमलेल्या
निरीक्षकांनी सादर केलेल्या ६० हून अधिक अहवालांचा एक सविस्तर अहवाल तयार करून तोजिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, मदत व
पुनर्वसन मंत्री आणि कृषी मंत्री यांना देखील हा अहवाल सादर केला जाईल.
ई-पीक पाहणी मुदतवाढ:आमदार देशमुख यांनी सांगितले की, मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर ई-पीक पाहणीची मुदत
३० सप्टेंबरवरून आता ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. येत्या महिन्या ई-पीक पाहणी आणि
पीक कापणी प्रयोगावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दक्ष राहून शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन
त्यांनी केले.
सरकारवर हल्लाबोल: ‘शक्तीपीठसाठी २० हजार कोटी, शेतकऱ्यांसाठी नाही!’
शेतकऱ्यांच्या नुकसानीवर केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करताना आमदार देशमुख म्हणाले,
केंद्र व राज्य सरकार काहीतरी आकडे जाहीर करून वेळ मारून नेईल. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणे हे
विरोधी पक्ष म्हणून आपले काम आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी वीस हजार कोटी रुपये सरकारने काढून
ठेवले, पण शेतकऱ्याला मदत करायला त्यांच्याकडे पैसे नाहीत.
पूढे बोलतांना ते म्हणाले की, लातूर जिल्ह्यातील सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने
नुकसान झाले आहे. सत्ताधाऱ्यांनी जनतेवर खूप अन्याय केला असून, काँग्रेस पदाधिकाऱ्यांशिवाय
शेतकऱ्यांच्या बांधावर इतर कोणीही गेलेले नाही. संकटकाळात काँग्रेस पक्ष सामान्य माणसाच्या
मदतीसाठी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करण्याचे केले आवाहन
या बैठकीत उदगीर येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आमदार देशमुख यांना माळहिप्परगा
सर्कलमध्ये शेतकरी मारुती संग्राम रायकवाडे यांची ६ एकर जमीन खरडून गेल्याने त्यांनी आत्महत्या
केल्याची माहिती दिली. या घटनेबद्दल दुःख व्यक्त करून आमदार देशमुख यांनी कोणत्याही शेतकऱ्यांने
आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलू नये, असे भावनिक आवाहन केले. शेतकऱ्यांच्या पाठीशी
काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे आणि मदत मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दांत त्यांनी
शेतकऱ्यांना धीर दिला.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य
धनंजय देशमुख, रेणा कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख आणि व्हा. चेअरमन प्रवीण पाटील,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव कल्याण पाटील, समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हा. चेअरमन
विजय देशमुख, पद्माकर उगिले, आशिष पाटील, पंकज शेळके, राहुल देशमुख, अजित माने, प्रवीण
पाटील, डॉ. दिनेश नवगिरे, सचिन पाटील, सुभाष घोडके, हमीद शेख, प्रभाकर बंडगर, चंद्रकांत मद्दे,
किरण बाबळसुरे, राम स्वामी आदींनी आपापल्या मंडळातील केलेल्या कामाचा अहवाल सादर केला.या बैठकीचे प्रास्ताविक करताना लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी, काँग्रेस
निरीक्षकांनी चिखलात जाऊन पाहणी केल्याबद्दल कौतुक केले.

—
