• Wed. Oct 15th, 2025

… तर सरकाला श्वास घेणेही घेणे अवघड होईल-आमदार रोहित पवार

Byjantaadmin

Oct 5, 2025

… तर सरकाला श्वास घेणेही घेणे अवघड होईल…. अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करा
तुम्ही त्यावेळी खोटं बोलत होता.. अन् आताही खोटंच बोलतोय म्हणून सांगून टाका….
आमदार रोहित पवार…..
आमदार रोहित पवार यांनी दिली 13 तारखेची अल्टीमेटम….


निल‌ंगा, ता. चार : मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टी मुळे व महापुरामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून बोललात पत्र दिले मग आता काय बदल बोलत आहात असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना केला. सत्तेत आल्यानंतर एक भाषा विरोधी पक्ष नेता असताना वेगळी भाषा किती खोटं बोलताय हे जनतेला सांगून टाका शेतकऱ्यांना 13 तारखेपर्यंत भरीव मदत करा अन्यथा श्वास घेणेही मुश्किल करून टाकू असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला.
निलंगा तालुक्यातील लिंबाळा येथे अतिवृष्टी भागाचा पाहणी दौरा गुरूवारी ता. दोन रोजी आमदार रोहित पवार यांनी केला याप्रसंगी ते बोलत होते. अतिवृष्टी व महापुराने मोठ्या प्रमाणात शेती पिकाची नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये द्या कर्जमाफी करण्याची हीच वेळ आहे कर्जमाफी करा… ओला दुष्काळ जाहीर करा.. मजुरांना आर्थिक मदत करा, काल व आज मी 40 गावामध्ये गेलो आहे वडिलांकडे पैसे नाहीत शाळेची फीस कशी भरायची असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. शेतकऱ्याकडे बियाणाला पैसा नाही यासाठी वेगळा अनुदान देऊन कर्जमाफी करावीच लागेल अशी मागणी त्यांनी यावेळी केली. शिवाय सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते असताना अनेक वेळा ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून मागणी केली, पत्र दिले परंतु आता सध्या ते मुख्यमंत्री आहेत त्यावेळी एक बोलले आणि आता एक बोलत आहेत. म्हणून त्यावेळी मी खोटं बोललो आता खोटं बोलतोय एक वेळ जनतेला सांगून टाका.. शेतकऱ्यांची चेष्टा करू नका असा टोला त्यांनी यावेळी लगावला. 13 ऑक्टोबर पर्यंत मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्या श्वास घेणे मुश्किल करून टाकू असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला.
दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी आमदार रोहित पवार यांच्यासमोर अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकाबाबत कैफियत मांडल्या आता आमचं शेत रब्बी पेरायलाही येत नाही.. खरीप हंगाम गेला रब्बी हंगाम गेला आम्ही जगावं कसं… सगळे मातीत वाहून गेलय.. खरीप हंगामातील पिकाचा चिखल झाला आहे अशी निराशा जनक प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी आमदार रोहित पवार यांच्यासमोर मांडल्या यावेळी जिल्हा परीदेचे माजी उपाअध्यक्ष सभाजीराव पाटिल शिरूर अनतपाळकर, तालुका अध्यक्ष सुधीर मसलगे, अगद जाधव, सदीप मोरे, महेश चव्हाण इफरोज शेख, निजाम शेख, सचिन राजनाळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *