धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पुष्पहार अर्पण करून केले विनम्र अभिवादन
LATUR राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी गुरुवार दि. २ ऑक्टोबर रोजी लातूर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे जाऊन धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, माजी उपनगराध्यक्ष मोहन माने, रेणा सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रवीण पाटील, माजी उपमहापौर कैलास कांबळे, लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष घोडके, प्रा. प्रवीण कांबळे, इम्रान सय्यद, व्यंकटेश पुरी, बाबासाहेब गायकवाड, चंद्रकांत चिकटे, अतिश चिकटे, दगडूआप्पा मिटकरी, संजय ओहळ, सुमित खंडागळे, राजू गवळी, अकबर माडजे, गोरोबा लोखंडे, करुणा शिंदे, सुलेखा कारेपूरकर, शरद देशमुख, पंडित कावळे, सुरेश चव्हाण, राम स्वामी, गोटू यादव, आसिफ बागवान, देविदास बोरुळे पाटील, यशपाल कांबळे, राज क्षिरसागर, अंगद गायकवाड, फारूक शेख, बिभीषण सांगवीकर, मोहन सुरवसे, राजू गवळी, प्रवीण सूर्यवंशी, रमेश सूर्यवंशी, गोपाळ बुरबुरे, विष्णुदास धायगुडे, अंगद गायकवाड, राम स्वामी, विजय टाकेकर, अब्दुल्ला शेख, करीम तांबोळी, अभिमान भोळे आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.
