शिरूर अनंतपाळ ;- शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने हे अतिवृष्टी महापूर यामुळे शेतकऱ्याचे झालेले नुकसान पाहणी दौरा करीत असताना शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख उबाठा गटाच्या श्रीमती सरोजाताई गायकवाड व शिरूर अनंतपाळ येथील एक साहित्यिक, विचारवंत ,ज्येष्ठ कवी ज्यांनी आत्तापर्यंत शिरूर अनंतपाळ तालुका लातूर जिल्हा महाराष्ट्र राज्य स्तरीय कवी संमेलन घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेले हे दोन्ही शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांच्या विचाराने प्रेरित होऊन पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी प्रवेश करत असताना सरोजाताई गायकवाड म्हणाल्या सर्वसामान्यांचे भलं करणारं नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे आहेत या महाराष्ट्राला आधार देणारा एकमेव नेता म्हणजे एकनाथ शिंदे साहेब म्हणून आम्ही शिवसेनेत प्रवेश करीत आहोत असे म्हणाले. यावर शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी शिवसेना हा एक विचार असून शिवसेना हा एक परिवार आहे. शिवसेनेत काम करणारा प्रत्येक शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांच्या कुटुंबातला सदस्य आहे सुख असेल दुःख असेल हे सगळं आपल्या सर्वांच आहे असं समजून काम करणारा पक्ष जर कोणता असेल तर फक्त आणि फक्त शिवसेना आहे .आणि या महाराष्ट्राला उज्वल भविष्य देणारा पक्ष एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाच आहे निश्चित स्वरूपांना आपल्या विचाराला कसल्याही प्रकारचा तडा न जाऊ देता आपला मान सन्मान करून आपल्याला वागणूक दिली जाईल असा विश्वास जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी दिला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विकास शिंदे, औसा तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे, निलंगा तालुका महिला आघाडी सेनेच्या तालुकाप्रमुख विधीज्ञ वर्षा शिंदे ,रेखा पुजारी, दैवता सगर ,निलंगा नगरीचे माजी सभापती शरद पेटकर ,युवा सेनेचे जिल्हाप्रमुख युवराज वंजारे, महेश चांदणे ,शिरूर आनंदपाल शहराचे शहर प्रमुख विनोद धुमाळे, शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
