जागृति शुगर कारखान्याचे २ लाख १५ हजार मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप
७७ लाख ९४ हजार ९०० युनिटची वीज निर्मिती
चालु हंगामात कमी दिवसात विक्रमी गाळप नवीन उच्चांक
लातूर दि. २७.
मराठवाडा विदर्भ राज्यात खाजगी साखर कारखानदारीत उस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षा अधिक भाव देणारा लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड ऑलाईंड इंडस्ट्रीज या साखर कारखान्याने चालु २०२२- २३ च्या गाळप हंगामात सोमवारी काल २६ नोव्हेंबर अखेर कारखान्याने ५० दिवसात २ लाख १५ हजार २१० मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून को जनरेशन च्या माध्यमातुन ५१ दिवसात ७७ लाख ९४ हजार ९०० वीज युनिट निर्मिती केली असून महावितरण कंपनीकडे एक्सपोर्ट केले आहे मागच्या दहा वर्षापूर्वी झालेले सर्व गाळप यावर्षी कारखान्याने मोडीत काढून कमी दिवसात जास्तीचे गाळप करून नविन विक्रम प्रस्थापित केला आहे
*चालु हंगामात कमी दिवसांत जास्तीचे गाळप*
चालु गाळप हंगामात साखर कारखान्याने ५० दिवसात २ लाख १५ हजार २१० मेट्रिक टन उसाचे गाळप करून त्यातून २ लाख २ हजार ७५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले असुन दहा वर्षापूर्वी झालेले सर्व उस गाळपाचे या हंगामात विक्रम मोडित काढून कमी दिवसात जास्तीचे गाळप करून नवीन विक्रम जागृती शुगर ने निर्माण केला आहे चालु हंगामात लागवड केलेल्या नोंदी प्रमाणे उस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊसाचे गाळप व्यवस्थित नियोजन करून सुरू असल्याचे सांगण्यात आले
राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी जागृती शुगर चे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या अध्यक्षा सौ गौरवी अतुल भोसले (देशमुख) यांच्या नेतृत्वाखाली या साखर कारखान्याने मागच्या १० वर्षात या भागांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षा अधिक भाव देवुन आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न केला आहे जिल्ह्यातील देवणी, निलंगा, शिरूर अनंतपाळ, उदगीर चाकुर,येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम या जागृती शुगर मुळे होत असल्याची माहिती जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांनी दिली