महानगरपालिके मार्फत स्वच्छता हि सेवा पंधरवाडा अंतर्गत सायकल रॅली संपन्न
लातूर महानगरपालिके मार्फत शासनाच्या आदेशाप्रमाणे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर स्वच्छता हि सेवा पंधरवाडा आयोजित करणेबाबत आदेशित केले असून आज दिनांक २४/०९/२०२५ रोजी आपलं लातूर सायकलोत्थान २०२५ कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी रोड लातूर ते गंज गोलाई ते लातूर शहर महानगरपालिका पर्यंतचे आयोजन करण्यात आले सदर रॅलीस मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी हिरवा झेंडा दाखवुन सुरूवात केले.
स्वच्छता ही सेवा २०२५ पंधरवाडा निम्मीत विविध कार्यक्रम लातूर शहर महानगरपालिका येथे आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मानसी यांच्या आदेशानुसार तसेच उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे.
सदर रॅलीमध्ये मुख्य स्वच्छता अधिकारी श्री कलीम शेख, स्वच्छता विभाग प्रमुख. श्री.रमाकांत पिडगे, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री.रवी कांबळे, श्री.धोंडिबा सोनवणे, श्री.शिवराज शिंदे, श्री.अक्रम शेख तसेच स्वच्छता निरीक्षक व लातूर सायकलिस्ट क्लबचे, श्रावण उगले, उपाध्यक्ष प्रतापसिग बिसेन, सचिव श्रीरंग मद्रेवार, साकलिष्ट सदस्य शब्बीर शेख, अभिजित देशपांडे, कुस्तीपटू चेतन जावळे, भाग्यश्री शिंदे, गंगाधर बिराजदार, संदेश महिंद्रकर व इतर उपस्थित होते.

