• Thu. Feb 5th, 2026

विद्यार्थ्यांची एक भेट आयुक्तासोबत मनपा शिक्षण विभागाचा उपक्रम

Byjantaadmin

Sep 13, 2025

विद्यार्थ्यांची एक भेट आयुक्तासोबत मनपा शिक्षण विभागाचा उपक्रम

लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त मानसी यांच्या सूचनेनुसार उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे व शिक्षणाधिकारी श्वेता नागणे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

लातूर/ प्रतिनिधी: या उपक्रमांतर्गत लातूर शहर महानगरपालिका  सावित्रीबाई फुले मनपा शाळा क्रमांक ०९, मंठाळे नगर मधील जुलै महिन्यात झालेल्या गुणवत्ता चाचणीतील इयत्ता ८ वी व ९ वीतील पहिल्या दहा विद्यार्थ्यांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली होती.या मुलांना महानगरपालिकेत भेटीसाठी बोलावून स्वतः आयुक्त मानसी व अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव यांनी मुलांचे पुष्प  देऊन स्वागत केले. या प्रसंगी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. महादेव साठे यांनी महानगरपालिकेतील २१ विभागांची कार्यप्रणाली पीपीटीद्वारे विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. आयुक्तांनी तब्बल तीन तास सर्व विभागाच्या कार्यपद्धती बद्दल  सविस्तर संवाद साधला.

विशेष म्हणजे, प्रत्यक्ष  विद्यार्थ्याना आयुक्तांच्या खुर्चीवर बसवून कामकाजाचा अनुभव देण्याची संधी दिली. या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या जबाबदाऱ्या प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली.तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छता राखणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, पाण्याचा अपव्यय न करणे, विजेची बचत करणे व वृक्षलागवड करणे या पंचसूत्रीबद्दल मार्गदर्शन केले. उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या या अनुभवाचे स्वहस्तलिखित अहवाल तयार करण्यास सांगितला. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना आयुक्त श्रीमती मानसी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.या विशेष भेटीतून विद्यार्थ्यांना नागरी प्रशासनाबद्दल प्रत्यक्ष ज्ञान मिळाले असून उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *