डॉ.बाबासाहेबांनी धम्माचा बोधी वृक्ष लावला त्याचे जतन करण्याची जवाबदारी आपल्या सर्वांची आहे..भंते उपगुप्त महाथेरो
निलंगा प्रतिनिधी
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांसाठी धम्माचा महान असा बोधी वृक्ष लावला आहे. त्या बोधी वृक्षाला खत पाणी घालून त्याला वाढवणे त्याचा प्रचार,प्रसार करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.असे प्रतिपादन भंते उपगुप्त महाथेरो यांनी केले.ते लातुर जिल्ह्यातील ऐतिहासिक बुद्ध लेणी परिसर खरोसा येथील श्रावस्ती बुद्ध विहारावर भंते सुमेधजी नागसेन यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षावास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी थायलंड, कम्बोडीयां, व्हिएतनाम येथील अनेक भंतेगण उपस्थित होते. यावेळी देशाबाहेरील भंतेगण भारतात का आले व त्यांना आपल्या देशात कोणी आणले आहे.
याबदलची माहीती देण्यात आली. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की,भंते सुमेधजी नागसेन यांनी या भागात धम्माची प्रगती केलेली आहे. पण त्यांना आपण सर्वांनी तन- मन आणि धनाने दान केले पाहिजे आपण दान केले तरच हे सर्व मंगल कार्य पार पडणार आहे.धम्माचे काम करत असताना आपण उच्च शिक्षण घेऊन आपले कल्याण करुन घेणे गरजेचे आहे.आता शिक्षणही येथील मनुवादी शासन व्यवस्थेनी महाग केलेले आहे.अशी खंतहीत्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी उपस्थित भिक्खु संघांचीही धम्म देसना संपन्न झाली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भंते सुमेधजी नागसेन आणि डि. के. सुर्यवंशी यांनी केले.यावेळे माजी खासदार डॉ.सुनिल गायकवाड, श्रीशैल्य उटगे,ज्येष्ठ विधिज्ञ जगदिश (दादा) सुर्यवंशी,यांच्यासह लातुर,निलंगा,उमरगा,औसा तालुक्यातील शेकडो उपासक, उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
