निलंगा विधानसभा मतदार संघातील ६४ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा-अभय साळुंके
निलंगा ५०, देवणी ६, शिरूर अनंतपाळ तालुक्यात ८ ठिकाणी काँग्रेसचे सरपंच विजयी
लातूर जिल्ह्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निलंगा विधानसभा मतदार संघातील ६८ पैकी ५०, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ११ पैकी ८ तर देवणी तालुक्यातील ८ पैकी ६ अशा एकूण ६४ ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाचे सरपंच सदस्य निवडून आले आहेत अशी माहिती प्रदेश काँग्रेस सचिव अभय साळुंके, निलंगा तालुका काँग्रेस अध्यक्ष विजयकुमार पाटील, शिरूर अनंतपाळ तालुका अध्यक्ष आबासाहेब पाटील, देवनी तालुका काँग्रेस अध्यक्ष अँड अजित बेलकोने यांनी बोलताना दिली राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा आमदार अमीत विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निलंगा विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायती निवडणुका स्थानीक काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यांनी लढवल्या त्यात मोठ्या प्रमाणावर यश आले आहे