प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनल इन्स्टिट्यूट द्वारा मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न
लातूर (प्रतिनिधी):- नागनाथजी शिंदे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद लातूर व शेख चांद पाशा गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती लातूर यांचा सत्कार प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनल इन्स्टिट्यूट द्वारा संचलित केसी पटेल उर्दू प्रायमरी स्कूल व मॉडर्न इंग्लिश स्कूल 60 फूट रोड लातूर यांच्यावतीने शाळेमध्ये सत्कार करण्यात आला, पोलीस निरीक्षक संतोष पाटील विवेकानंद चौक पोलीस ठाणे लातूर यांच्या हस्ते शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. पाटील यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे ,घडलं पाहिजे एक सुजाण नागरिक बनले पाहिजे ,अशा भावना व्यक्त केल्या मी पण एक शिक्षकाचा मुलगा आहे. माझे वडील शेतकरी कष्टकऱ्यांच्या परिवारातून आहेत मी केवळ शिकल्यामुळे पोलीस अधिकारी बनू शकलो, तुम्ही पण शिका आणि मोठी व्यक्ती व्हा असं पोलीस निरीक्षक संतोषजी पाटील यांनी सांगितलं. याप्रसंगी शिक्षण अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी केसी पटेल उर्दू शाळेतील विद्यार्थी शिक्षक यांचे भरभरून कौतुक केले अल्पसंख्याक समाजाला शिक्षणाची अत्यंत गरज असून विद्यार्थी शिकले पाहिजेत आणि ते टिकले पाहिजेत अशा भावना
गटशिक्षणाधिकारीया.नी व्यक्त केल्या लातूर जिल्ह्यामध्ये प्रथम शिक्षण अधिकारी श्री नागनाथजी शिंदे व गटशिक्षणाधिकारी चांद पाशा शेख पंचायत समिती लातूर ते प्रथमतः रुजू झाल्याने अल्पसंख्याक शाळेच्या वतीने भव्य दिव्याचा सत्कार करण्यात आला या सत्कार प्रसंगी संस्थेचे सचिव लायक पटेल,व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस . मुख्याध्यापक बिलाल पटेल, मोहन हाके राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष, प्रल्हाद ईगे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, बाबू बनसोडे जिल्हा सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा कार्याध्यक्ष शिवचंद्र पांचाळ, खाजगी चे इस्माईल शेख, बागवान सर हजरत सुरतशाह उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, वजीर बागवान मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, दिनेश पांचाळ इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापीका, सुलताना मणियार मॉडर्न इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक, दिनेश हवा पाटील, फुलारी साहेब जमादार विवेकानंद चौक पोलीस स्टेशन लातूर अलीम पटेल सामाजिक कार्यकर्ते, नाजम सय्यद आली सामाजिक कार्यकर्ते, फैसल पटेल आदी उपस्थित होते
