मांजरा शुगर इंडस्ट्रीज (कंचेश्वर) चे सात लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ
मंगरूळ येथील कारखाना साईटवर मील रोलरचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांच्या हस्ते पूजन

लातूर भागातील इतर साखर कारखान्याचे चेअरमन,पदाधिकारी व ग्रामस्थ, मान्यवर उपस्थित
लातूर/ धाराशिव ;- धाराशिव येथील मांजरा शुगर इंडस्ट्रीज (कंचेश्वर) साखर कारखाना येणाऱ्या सन २०२५- २६ हांगमध्ये सात लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले असून त्यासाठी कारखाना प्रशासन स्तरावर जय्यत तयारी केली असून ऊस उत्पादकांनी आपला ऊस कारखान्यास द्यावा असे आवाहन करत ऊसाला रास्त दर देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी यावेळी केले ते धाराशिव जिल्ह्यातील मंगरूळ येथील मांजरा शुगर इंडस्ट्रीज (कंचेश्वर) च्या २०२५- २६ च्या गाळपासाठी मील रोलर पूजन सोमवारी राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख व लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासरावजी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार तथा धाराशिव जनता बँकेचे उपाध्यक्ष तथा विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वैजनाथराव शिंदे,धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी सभापती मुकुंदराव डोंगरे, प्रगतिशील शेतकरी विजय डोंगरे, ऊस उत्पादक शेतकरी बालिशकाका डोंगरे, अजिंक्य सरडे, बप्पा डोंगरे, रसिक दुलंगे, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील,जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे,मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, ट्वेन्टी वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, मांजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय देशमुख,रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख,मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले रेणा चे माजी चेअरमन सर्जेराव मोरे विलास साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष रवींद्र काळे, रेणाचे उपाध्यक्ष अँड प्रवीण पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव,मारुती महाराज चे उपाध्यक्ष सचिन पाटील,माजी अध्यक्ष गणपतराव बाजुळगे,जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, व कारखान्याचे जनरल मॅनेजर सतीश वाकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते
कारखाना कार्यक्षेत्रातील ६०० हेक्टरवर उस उत्पादक वाढीसाठी प्रयत्न
कारखाना कार्यक्षेत्रातील ६०० हेक्टरवर कारखान्याच्या वतीने ए आय टेक्नॉलॉजी यांच्या माध्यमातून उस उत्पादक लागवडीसाठी प्रात्यक्षिक पूर्ण केले असून उस विकास योजने अंतर्गत २७,७५० उस उत्पादक शेतकऱ्यांना (रोप) बेणे दीले आहेत तर या कारखाना परीसरात गेल्या दोन वर्षांत ३८,५०० वृक्षांची लागवड केली असून चालु गाळप हंगामाची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे
भूमिपूजन संपन्न
यावेळी कारखाना स्थळी होत असलेल्या महादेव मंदिर, गणेश मंदिर आणि हनुमान मंदिराचे तसेच नवीन साखर गोडाऊन चे भूमिपूजन राज्याचे माजी मंत्री मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक दिलीपरावजी देशमुख माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासरावजी देशमुख यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लातूर जिल्हा बँकेचे संचालक राजकुमार पाटील अनुप शेळके,जिल्हा काँग्रेसचे समन्वयक सचिन दाताळ, मांजरा परिवाराचे माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी, रेणापूर बाजार समितीचे उपसभापती शेषराव हाके संचालक प्रकाश जाधव, बाभळगाव येथील उपसरपंच गोविंद देशमुख,मांजरा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पंडित देसाई,रेणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बी व्ही मोरे, जागृती शुगर चे जनरल मॅनेजर गणेश येवले, जागृती शुगर चे मुख्य शेतकी अधिकारी रामानंद कदम, मांजरा शुगरचे प्रशासकीय अधिकारी तिवारी,मुख्य शेतकी अधिकारी नारायण धांडे,शेतकी अधिकारी शिवराम बिडवे,टेक्निकल जनरल मॅनेजर अनिल कदम, चीफ केमिस्ट बाळासाहेब पेठे, डीस्टलरी मॅनेजर उत्तम रायकर यांच्यासह उस उत्पादक शेतकरी सभासद उपस्थित होते.
कंचेश्वर मंदिरात घेतले दर्शन
आज श्रावण सोमवार असल्याने मंगरूळ तालुका तुळजापूर येथील प्राचीन ग्रामदैवत असलेले कंचेश्वर मंदिर येथे जावून राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब माजी आमदार तथा लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासरावजी देशमुख यांनी दर्शन घेतले मनोभावे पूजा केली