माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहरातील
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावर बाजाराला दिली भेट
लातूर (प्रतिनधी) : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे
माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार
अमित विलासराव देशमुख यांनी आज शनिवार दि. १२ जूलै रोजी सकाळी लातूर
शहरातील कव्हा नाका परिसरातील लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्व.
माणिकराव सोनवणे गुळ मार्केट कडबा व जनावर बाजाराला भेट देऊन तेथील
सोयी सुविधांची पाहणी केली, जनावरे विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांसोबत
या ठिकाणी संवाद साधला, त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेतल्या, त्या
समस्या तातडीने सोडवण्याच्या संबंधितांना सूचना दिल्या आहेत.
यावेळी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे,
उपसभापती सुनील पडीले, माजी सभापती ललितभाई शहा, प्रभारी सचिव अरविंद
पाटील, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन ॲड. समद पटेल,
ट्वेंटीवन व्हाईस चेअरमन विजय देशमुख, संचालक आनंद पवार, अनिल पाटील,
श्रीनिवास शेळके, युवराज जाधव, बळवंत पाटील, सुभाष घोडके, बालाप्रसाद
बीदादा, बालाजी वाघमारे, शिवाजी देशमुख, शिवाजी कांबळे, रमेश सूर्यवंशी,
सुंदर पाटील कव्हेकर, व्यापारी अफसर कुरेशी, अफसर कुरेशी, समाधान
आदमाने, प्रमोद जाधव आदिसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक,
अधिकारी, कर्मचारी, काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी शेतकरी व्यापारी
उपस्थित होते.
