7 लाख हजार 99 रुपयांचे एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज ,एक गावठी पिस्टल जप्त. 03 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने लातूर शहरातील एल.आय.सी कॉलनी परिसरात कारवाई करत 07 लाख 99 हजार 900 रुपये किमतीचा 78 ग्रॅम मेफेड्रोन म्हणजेच एमडी ड्रग्स जप्त.पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात लातूर पोलिसांकडून अवैध धंद्यावर मोठ्या प्रमाणात छापेमारी करून गुन्हे दाखल करण्यात येत असून त्या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने दिनांक 10/07/2025 रोजी दुपारी 03 वाजण्याच्या सुमारास एल.आय.सी कॉलनी परिसरातील एका घरा मध्ये इसम नामे
1) गणेश अर्जुन शेंडगे, वय 26 वर्ष, राहणार एल.आय.सी कॉलनी,लातूर.
2) रणजीत तुकाराम जाधव वय 24 वर्ष, राहणार दहिसर केकतीपाडा, गुणुबुवा कंपाऊंड, गोदावरी राणीचाळ, दहिसर पूर्व, मुंबई
3) एक फरार आरोपी
असे असल्याचे सांगितले. वर नमूद आरोपींनी एमडी (मेफेड्रोन) ड्रग्सची अवैध विक्री करणे साठी स्वतःच्या घरामध्ये बाळगलेले अंमली पदार्थ एकूण 78.78 ग्रॅम वजनाचा 3,93,900 रू. किमतीचा अंमली पदार्थ एमडी ड्रग्स, गुन्हयात वापरलेले वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 07 लाख 99 हजार 900 रुपयांचा अमली पदार्थ एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज हस्तगत करण्यात आला आहे एमडी ड्रग्सची विक्री करताना,व गावठी पिस्टल बाळगलेले मिळून आलेले 03 जणा विरुद्ध पोलीस ठाणे विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. तर फरार आरोपीचा शोध सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, सदानंद भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे, साहेबराव हाके, रियाज सौदागर, माधव बिलापट्टे, तुराब पठाण, मनोज खोसे, गोविंद भोसले, नवनाथ हासबे , नाना भोंग, मोहन सुरवसे, सचिन धारेकर, महादेव शिंदे, बंडू नीटुरे, सचिन मुंडे यांनी केली आहे.
