विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याबद्दल आमदार अमित विलासराव देशमुख यांचे प्रभाग १४ मधील सरस्वती कॉलनी येथील नागरिकांनी मानले आभार
लातूर ;महाराष्ट्र विधानसभा निवडणुक प्रचार काळात आमदार अमित विलासराव देशमुख हे प्रभाग क्रमांक १४ मधील सरस्वती कॉलनी येथे आले असता परिसरातील महिला व ज्येष्ठ नागरिकांनी अमोल देशपांडे ते पत्रकार घोणे यांच्या घरापर्यंत रस्ता व नाली करण्याची मागणी केली होती. सदर मागणीनुसार रस्त्याचे डांबरीकरण व नाली बांधकाम पूर्ण होऊन हा प्रश्न आता मार्गी लागला आहे.दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याबद्दल आमदार अमित विलासराव देशमुख यांचे लातूर शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील सरस्वती कॉलनी परिसरातील नागरिकांनी आभार मानले आहेत.
यावेळी प्रभाग क्रमांक १४ चे काँग्रेस पदाधिकारी गणेश एसआर देशमुख, स्मिता अमोल देशपांडे, रेश्मा संतोष नाशिकर, दिपाली अमित उबाळे, सुप्रिया सचिन बरगले, सारिका गणेश धुळगंडे, कविता देविदास धुमाळ, तब्बसुम मुस्तफा मुजावर, नीता संतोष देशमुख, मनीषा संदीप साळुंखे, मंजुषा संदीप शिरूरे, निलम गणेश पन्हाळे, अस्मिता अनिरुद्ध मुचलंबकर यांनी या कामाबाबत समाधान व्यक्त करून आमदार अमित विलासराव देशमुख यांचे आभार मानले आहेत.
