शिरूरअनंतपाळच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीत राखला जातीय समतोल माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत
….
निलंगा, ता. आठ : शिरूरअनंतपाळ येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी (लिंगायत) समाजाचे चंद्रकला शिवाजी शिवणे तर उपनगराध्यक्ष पदी (धनगर) समाजाचे अनंत जनार्दन काळे यांची बिनविरोध निवड झाली याबद्दल माजी खासदार श्रीमती रुपाताई पाटील निलंगेकर यांनी सत्कार केला या निवडीत माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जातीय समीकरणाचा समतोल साधत दोन्ही समाजाला प्राधान्य दिल्याने या निवडीचे सर्वच स्तरातून स्वागत केले जात आहे.
सोमवारी ता. ८ रोजी निवड झाल्यानंतर माजी खासदार श्रीमती रुपाताई पाटील निलंगेकर यांची नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी निलंगा येथे भेट घेतली यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना रूपाताई पाटील म्हणाल्या की, गेल्या अनेक वर्षापासून आपण सर्वजण संभाजी भैयांना मुलाप्रमाणे जपलेले आहात मी त्यांची आई असली तरी तुम्ही जनताच त्यांना राजकीय जन्म दिला आहे. ज्या ज्या वेळी सत्तेमध्ये वाटा देण्याचा योग येतो त्यावेळी सर्व जाती धर्माचा विचार करून त्यांना प्रतिनिधित्व देण्याचे काम त्यांनी केले आहे शिरूर अनंतपाळ हे अतिशय सुसंस्कृतपणा असलेली गाव आहे मिळालेल्या संधीचा उपयोग विकास कामासाठी सर्वांनी एकत्रितपणे गावचा विकास करण्यासाठी काम करणे अत्यंत गरजेचे आहे देशात व राज्यात आपली सत्ता आहे त्यामुळे विकास कामासाठी कोणताही निधी कमी पडणार नाही समज गैरसमज बाजूला सारून गावच्या विकासासाठी कोपाने काम करा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. धनगर समाजाच्या वतीने घोंगडी व काठी देऊन रूपाताई पाटील निलंगेकर यांचा सत्कार केल्यानंतर घोंगडीचा सत्कार मला पूर्वीपासून आवडतो माझ्या जडणघडणीमध्ये धनगर समाजाचा मोलाचा वाटा असल्याची त्यांनी सांगितले.
यावेळी ओबीसी प्रवर्गातील धनगर समाजाला उपनगराध्यक्ष पद देऊन सन्मान केल्याबद्दल माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांचा धनगर समाजाच्या वतीने घोंगडी व काठी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष मायाताई धुमाळे, सुषमाताई मठपती, उमाकांत देवंग्रे, संतोष शेट्टे, गणेश सलगरे, शामल शिंदे, गणेश धुमाळे, कुसुमताई खरटमोल, शंकर दाजी बेंबळगे, किरण कोरे, सचिन सांगवे, दत्ता शिंदे, संदीप बिरादार, संकेत बनकर यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
