माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत
भाजपा मंडळध्यक्षाच्या नियुक्त्या
निलंगा:
माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी निलंगा विधानसभा मतदारसंघातील मंडळध्यक्षांचा नियुक्त्या देण्यात आल्या . दि.21 एप्रिल रोजी निलंगा येथील भारतीय जनता पक्षाच्या पक्ष कार्यालयात नियुक्ती देण्याचा कार्यक्रम संपन्न झालायानिवड प्रक्रियेसाठी पक्ष निरीक्षक म्हणून माजी जि प अध्यक्ष राहुल केंद्रे , संजय दोरवे,दगडू सोळुंके,बापूराव राठोड,प्रशांत पाटील यांनी त्या विभागाचा अभ्यास करून पक्ष वाढीसाठी काम करणाऱ्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांचे नावे देण्यात आली होती, माजी समाजकल्याण सभापती संजय दोरवे यांनी सर्व मंडळध्यक्षांची नावे जाहीर केली.यात निवड झालेले नवनियुक्त मंडळाध्यक्ष :
निलंगा ग्रामीण – कुमोद लोभे
निलंगा शहर – रवी फुलारी
औराद – आनिल भंडारे
शिरूर अनंतपाळ – माधव बिराजदार,
देवणी – शिवराज बिराजदार
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे,वीरभद्र स्वामी,काशिनाथ गरीबे,मंगेश पाटील,गोविंद चिलकुरे,सदाशिव पाटील,सह अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते,
,,,केंद्र राज्याच्या योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांला मिळवून द्या,,,आ, निलंगेकर

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले आपण सर्वजण आपल्या संघटन कौशल्याने निलंगा विधानसभा मतदारसंघातील भाजप संघटन आणखी वाढवून पक्षाला यशाच्या शिखरावर घेऊन जाल, हा पूर्ण विश्वास आहे.त्याच बरोबर सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत कामात असले पाहिजे, पदाधिकाऱ्यांनी कामाचा पाठपुरावा करून काम धसास लावले पाहिजे ,व केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजना योग्य लाभार्थ्या पर्यंत पोहणचवाव्यात असे त्यांनी सांगितले,व सर्व नवनियुक्त मंडळाध्यक्षाचा सत्कार करून पुढील कार्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या