• Mon. Apr 28th, 2025

शेतीमाल हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यापूर्वी त्यासंदर्भात व्यापक प्रसिद्धी करावी-माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची मागणी

Byjantaadmin

Apr 25, 2025

शेतीमाल हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यापूर्वी त्यासंदर्भात व्यापक प्रसिद्धी करावी
कापूस व इतर शेतीमाल उत्पादकता वाढवण्यासाठी
शासनाने बाजार समितीमार्फत मार्गदर्शक यंत्रणा उभारावी,
पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची मागणी

मुंबई (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कापूस व इतर शेतीमाल कमी किमतीत विकला जाऊ
नये यासाठी, शासनाने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यापूर्वी त्यासंबंधी
व्यापक प्रसिद्धी करावी, शेतकऱ्यांची उत्पादक वाढवण्याबरोबरच निर्यातक्षम
माल तयार करण्यासाठीही बाजार समिती मार्फत शासनाने मार्गदर्शन यंत्रणा
उभारावी आदी मागण्या, पणान मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे माजी मंत्री
आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केल्या आहेत.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाची सीसीआय मार्फत व्यवस्थित खरेदी
होत नसल्याच्या संदर्भाने अर्थसंकल्पी अधिवेशनात माजी मंत्री आमदार अमित
विलासराव देशमुख व इतर विधानसभा सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.
त्याअनुषंगाने महाराष्ट्राचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी
मंत्रालयात संबंधित विधानसभा सदस्यांसमवेत बैठक आयोजित करून विस्तृत
चर्चा केली. काही तांत्रिक कारणामुळे ९ फेब्रुवारी २०२५ रोजी कॉटन
कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) च्या वतीने सुरू असलेल्या काही कापूस खरेदी
केंद्रावर खरेदी प्रक्रिया विस्कळीत झाली होती मात्र त्यानंतर,१२४ खरेदी
केंद्रावर कापूस खरेदीची प्रक्रिया नियमित सुरू राहिली अशी माहिती या
बैठकीदरम्यान पणन मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली.
सदरील बैठकीस उपस्थित राहिल्यानंतर माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी,
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कापूस त्यानी कमी किमतीत विक्री करू नये
यासाठी कापूस खरेदी केंद्र, कधी ? आणि कुठे ? सुरू होणार आहेत याची
शासनाने व्यापक प्रमाणात प्रसिद्ध करावी.
शेतकऱ्यांना कापूस उत्पादनातून फायदा मिळावा यासाठी निर्यातक्षम
कापसाची लागवड करण्यासाठीही शासन आणि बाजार समिती मार्फत मार्गदर्शन
करण्यात यावे , कापूस व इतर शेतीमालाचे उत्पादन वाढवण्यासाठी, योग्य
पद्धतीचे मार्गदर्शन करणारी यंत्रणाच शासन व बाजार समितीच्या वतीने
उभारण्यात यावी, शेतीमालाच्या हमीभाव खरेदी केंद्रांना मंजुरी देताना
त्यात होणारा गोंधळ संपुष्टात आणावा आदि सूचना ही या बैठकीदरम्यान आमदार
अमित विलासराव देशमुख यांनी केल्या आहेत,
प्रधानमंत्री श्री जयकुमार रावल यांनी या सर्व सूचनांचे स्वागत करून त्या
या संबंधाने योग्य कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही या प्रसंगी दिली आहे.
राज्यात नव्याने सुरू होत असलेल्या बाजार समित्या, बाजार समित्यांच्या
कारभारातील अडचणी या संदर्भानेही बैठकीत विस्तृत चर्चा झाली अशी माहितीमाजी आमदार अमित देशमुख यांनी बैठकीनंतर दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed