• Fri. May 2nd, 2025

अर्जेंटिनाकडून पराभवानंतर फ्रान्समध्ये दंगल:अनेक शहरांमध्ये हजारो चाहते हिंसक, वाहनांची केली जाळपोळ; पोलिसांशीही चकमक

Byjantaadmin

Dec 19, 2022

फुटबॉल विश्वचषकाच्या फायनलमध्ये अर्जेंटिनाकडून पराभूत झाल्यानंतर फ्रान्सचे चाहते गोंधळ घालत आहेत. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये हजारो चाहत्यांनी दंगल सुरू केली आहे. वाहनांची मोडतोड करून जाळपोळ करण्यात आली. पॅरिसशिवाय ही हिंसा इतर अनेक शहरांमध्ये पसरली आहे.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. पॅरिसमध्ये हजारो पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, ल्योन, नाइस येथेही हिंसक घटना घडल्या आहेत. पॅरिसच्या प्रसिद्ध चॅम्प्स एलिसेसमध्येही चाहते एकमेकांशी भिडले.

वॉटरकॅनन, अश्रुधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या… 14 हजार पोलीस तैनात
फ्रान्सचा विजय पाहण्यासाठी लाखो चाहते फ्रेंच शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी जमले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, अर्जेंटिनाकडून ४-२ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर तो असह्य झाला. संतप्त चाहत्यांनी पोलिसांशीही झटापट केली. अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. चाहत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी वॉटरकॅननचा वापर करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *