• Sun. Jun 21st, 2026

लातूर जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

Byjantaadmin

Jan 29, 2025

लातूर जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

लातूर दि. 29 (जिमाका) : जिल्ह्यासाठी 2025 मधील तीन स्थानिक सुट्ट्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी 20 जानेवारी, 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार जाहीर केल्या आहेत. यानुसार 1 सप्टेंबर 2025 (सोमवार) रोजी जेष्ठा गौरीपुजन, 20 ऑक्टोबर 2025 (सोमवार)  रोजी नरक चतुर्दशी आणि  19 डिसेंबर 2025 (शुक्रवार) रोजी दर्शवेळा अमावस्या निमित्त जिल्ह्यात स्थानिक सुट्टी राहणार आहे.

जिल्ह्यातील उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेतील कार्यालये, केंद्रीय कार्यालये, केंद्रीय प्रशासनातील कार्यालये व बँकेच्या कक्षातील कार्यालये वगळता लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेच्या कक्षेतील कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, जिल्ह्यातील कोषागारे, महामंडळाची कार्यालये व इतर सर्व खाजगी शैक्षणिक संस्था यांना या तिन्ही सुट्ट्या लागू राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *