विद्यापीठाच्या बॉल बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्र महाविद्यालयास तृतीय क्रमांक
निलंगा-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व महात्मा फुले महाविद्यालय, किनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच बॉल बॅडमिंटन स्पर्धा पार पडल्या.यामध्ये निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या मुलीच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला.या संघामध्ये सूर्यवंशी रोहिणी प्रकाश, सूर्यवंशी प्रियंका बालाजी ,सूर्यवंशी साक्षी गुरुनाथ ,मेत्रे संध्याराणी राजाराम. गावंडगावे संजना भास्कर, मेत्रे ऐश्वर्या बालाजी या मुलींनी सहभाग नोंदवला.
या मुली मधून सूर्यवंशी रोहिणी व सूर्यवंशी प्रियंका यांची मागील वर्षी अण्णामलाई विद्यापीठ,चेन्नई येथील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली होती. विद्यार्थिनींना क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ. गोपाळ मोघे व ज्योती पाटील मॅडम,यांचे मार्गदर्शन लाभले.

खेळाडूंच्या या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर साहेब तसेच संस्थेचे सचिव श्री बब्रुवान सरतापे, प्राचार्य डॉ. एम. एन. कोलपुके बीसीए चे विभाग प्रमुख श्री मदरसे तसेच गिरीश पाटील व सर्व प्राध्यापक, प्राध्यापककेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.