• Tue. Apr 29th, 2025

महादेव कोळी समाज करणार पुन्हा ‘जलसमाधी’ आंदोलन ;निलंगा उप विभाग अंतर्गत तीन हजार जातीचे दाखले प्रलंबित

Byjantaadmin

Jan 5, 2025

महादेव कोळी समाज करणार पुन्हा ‘जलसमाधी’ आंदोलन 

उपविभागीय अधिकाऱ्याकडून जात प्रमाणपत्राची आडवणूक

निलंगा उप विभाग अंतर्गत तीन हजार जातीचे दाखले प्रलंबित

………….

निलंगा : उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्याकडून तिन्ही तालुक्यातील जवळपास तीन हजार जातीचे दाखले गेल्या दोन महिन्यांपासून प्रलंबित आहेत. सर्व बाबीची पूर्तता करूनही उपविभागीय अधिकारी यांच्या कडून जात प्रमाणपत्राची अडवणूक केली जात असल्याचा आरोप करुन प्रजासत्ताक दिनाला पुन्हा महादेव कोळी समाज करणार सामुयिक जलसमाधी आंदोलन  करणार असल्याचा इशारा मराठवाडा सकल आदिवासी महादेव कोळी जमातीचे नेते चंद्रहास नलमले यांनी रविवारी ता. पाच रोजी दिला आहे.

निलंगा तालुक्यात मागील काळात सुलभतेने जातीचे प्रमाणपत्र मिळावे, वैद्यता मिळावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे आधी मागण्यासाठी तेरणा नदी पाञात महादेव कोळी समाज बांधवांचे जलसमाधी आंदोलन मोठ्या प्रमाणात झाले होते. तसेच या  जलसमाधी आंदोलनाची दखल घेवून भाजपाचे युवानेते अरविंद  पाटील निलंगेकर, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसिलदार प्रसाद कुलकर्णी यानी  सर्व आटी मान्य करून टी.सी. व निर्गम उतारा या पुराव्यावरच जात प्रमाणपत्र देऊ असे  लेखी अश्वासन दिल्यानंतरच  जल समाधी आंदोलन मागे घेण्यात आले होते. परंतु  निवडणूक काळात जात प्रमाणपत्र दाखल केलेल्या काही मोजक्याच लोकांना देण्यात आले माञ जवळपास तीन हजार समाज बांधवानी आपले प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाखल केले असून ते वेगवेगळ्या ञुटी काढून परत पाठवले जात आहेत. रक्तनात्यातील त्याच अडनावाचे वैधता प्रमाणपत्र असताना देखील १९५० चा पुरावा,रक्तनाते संबध,असे अनेक ञुटी काढून जात प्रमाणपञाचे प्रस्ताव परत केले जात आहेत. यामुळे समाजामध्ये संतापाची लाट तयार झाली आहे. यापुढे अशा जाचक अटी लावून आडवणूक केली तर समाज याहीपेक्षा मोठे आंदोलन करणार आहे. असा इशारा मराठवाडा सकल आदिवासी महादेव कोळी समाजाचे नेते चंद्रहास नलमले  यांच्या वतीने देण्यात आला आहे. या समाजाच्या वतीने यापूर्वी दळणवत आंदोलन, मुंडन आंदोलन असे वेगवेगळे आंदोलन केले होते. 1950 पूर्वी कोळी नोंदी झाल्या असून कोळी हेच महादेव कोळी, मल्हार कोळी आहेत याबाबत ब्रिटिश कालीन जनगणना, संदर्भ ग्रंथ असे पुरावे असतानाही यापूर्वी निलंगा उपविभागाकडून अनेक जातीचे प्रमाणपत्र दिले असतानाही सध्या अधिकाऱ्याकडून जाणून बुजून अडवणूक केली जात आहे यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप श्री. नलमले यांनी केला आहे. प्रलंबित असलेले जातीचे सर्व प्रमाणपत्र तात्काळ निर्गमित करावे, तात्काळ जात प्रमाणपत्राचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी समाजातील प्रमुख कार्यकर्त्याची बैठक संपन्न झाल्यानंतर करण्यात आली त्यानंतर येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी पुन्हा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा समाजाचे नेते चंद्र नलमले यांनी दिला. यावेळी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed