निलंगा पंचायत समितीत स्नेह संमेलन व प्रशिक्षण बी.डी.ओ. सोपान अकेले यांचा अभिनव उपक्रम
निलंगा ;निलंगा नूतन वर्षाचे औचित्य साधून दिनांक एक जानेवारी 2025 रोजी निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांनी कर्मचाऱ्यांचा स्रेह मेळावा व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.गटविकास अधिकारी सोपान अकेले यांच्या या अभिनव उपक्रमाचे निलंगा पंचायत समिती कर्मचारी वर्गाकडून कौतुक करण्यात येत आहे.दि 1 जानेवारी रोजी पंचायत समिती निलंग्याच्या पं. दीनदयाळ उपाध्याय सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास अधिकारी कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले.
बालविकास प्रकल्प अधिकारी बी.डी. कोरे .यांनी सर्व कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन नवीन वर्षातील कामे चांगल्या पद्धतीने करण्याबाबत आवाहन केले. तसेच कनिष्ठ प्रशासनअधिकारी बालाजी मोहोळकर हे कनिष्ठ लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष झाल्याबद्दल व विभागातून निलंगा तालुक्याला उपाध्यक्ष पदाचा बहुमान मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.नवीन वर्षाच्या स्रेह मेळाव्यात बालाजी मोहोळकर, विस्तार अधिकारी जगताप, सह गटविकास अधिकारी एस .बी. आडे,होते .
गटविकास अधिकारी सोपान अकेले मार्गदर्शन करताना म्हणाले . नवीन वर्षात नवीन ऊर्जा घेऊन नवीन उपक्रम राबवून कामे करावीत. नवीन उमेद, नवीन ताकद, नवीन आव्हानांना सामोरे जावे. नवीन उपक्रमांना प्रतिसाद द्यावा व आपल्या पंचायत समिती विभागा मार्फत सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर, महिला अशा शेवटच्या घटकातील योग्य व गरजू लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा असे आवाहन उपस्थित कर्मचाऱ्यांना केले.
तसेच नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित होण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नोकरीची सुरुवात आणि योग्य प्रशिक्षण यामुळे नोकरी शेवटपर्यंत पूर्णत्वास जाते. असे प्रतिपादन एस.बी .आडे यांनी प्रशिक्षणा दरम्यान केले. जि प च्या विविध योजना कामांची माहिती इत्यादी बाबत प्रशिक्षणात माहिती देण्यात आली. रचना व कार्यपद्धती, सेवा प्रवेशोत्तर परीक्षा, जि.प व अधिनियम, मनासे नियम याचे मार्गदर्शन मोहोळकर यांनी केले. कार्यालयामध्ये वेळेचे बंधन आवश्यक असल्याबाबत सांगण्यात आले. ड्रेस कोड, ओळखपत्र वापर याची अनिवार्यता सांगण्यात आली. मागील वर्षी वृक्ष लागवडीसाठी सर्व कर्मचारी बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला. तसाच प्रतिसाद यावर्षीही कर्मचारी देतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पंचायत समितीत निर्माण झालेले महात्मा गांधी वाचनालय यास पुस्तक रुपी भेट देण्याचे ही आवाहन करण्यात आले. वृक्ष लागवड, वाचनालय याबरोबरच कर्मचा-यांना प्रशिक्षण हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम या वर्षी सुरुकरण्यात आला.याच बरोबर पंचायत समिती मधील कर्मचारी श्रीमती बी.जी पोतराजे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यानंतर नूतन वर्षाचा स्नेहमेळावा आयोजित केल्याबाबत गट विकास अधिकारी यांचे कर्मचारी बांधवांनी आभार व्यक्त केले.
