गोल्डक्रेस्ट हाय प्राथमिक शाळेत ब्रहमकुमारी नंदा बहेन यांचे
मुल्यशिक्षण, जीवनशैली आणि मनाचे संतुलन यावर मार्गदर्शन
लातूर प्रतिनिधी : शुक्रवार दि. ३ जानेवारी २५
विलासराव देशमुख फाऊडेशन अंतर्गत लातूर शहरात चालणाऱ्या गोल्डक्रेस्ट हाय
प्राथमिक शाळेत मुल्यशिक्षण आधारीत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या
अंतर्गत टवेन्टिवन ॲग्रीच्या संचालीका संस्थेच्या समन्वयक अदिती अमित देशमुख
यांच्या संकल्पलेतून ब्रहमकुमारी नंदा बहेन यांचे मार्गदर्शन ठेवण्यात
आले होते.
लातूर शहरातील गोल्डक्रेस्ट हाय प्राथमिक शाळेच्या प्रागंणात शुक्रवार
दि. ३ जानेवारी २५ रोजी सकाळी १० वाजता मुल्यशिक्षण आधारीत मुल्यशिक्षण,
जीवनशैली आणि मनाचे संतुलन यावर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न् झाला.
यावेळी टवेन्टिवन ॲग्रीच्या संचालीका अदिती अमित देशमुख, ब्रहमकुमारी
नंदा बहेन, ब्रहमकुमारी पूण्या बहेन, ब्रहमकुमारी सुषमा बहेन,
ब्रहमकुमारी प्रयाग बहेन, डॉ. सारिका देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात ब्रहमकुमारी नंदा बहेन, ब्रहमकुमारी पूण्या बहेन,
ब्रहमकुमारी सुषमा बहेन, ब्रहमकुमारी प्रयाग बहेन यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलतांना ब्रहमकुमारी यांनी प्रत्येक व्यक्तीमत्वातून श्रेष्ठ आणि
आदर्श जीवन तयार करण्यासाठी सर्वशक्तीमान शक्तीशी आपण जोडलो गेलो पाहिजे.
आपण कोण आहोत आणि आपला काय परीचय आहे, हे ओळखण्यासाठी अध्यात्मिक शक्तीच
अनुकरण करायला हव. चांगले जीवन आणि चांगला मनुष्य होण्यासाठी आपल संचलन
करणारी शक्ती ओळखयला हवी असे सांगतीले. या कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य उषाकिरण सुद, गुरुदीप कौर, संध्या
कुलकर्णी, रेशमा आतर, निता पवार, ज्ञानेश्वर माने यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक किरण आडे, सुत्रसंचलन राहूल इंगळे, तर आभार पुनम उगारे यांनी मानले.
