कासार बालकुंदा येथे सोमनाथ सुर्यवंशी यांना आदरांजली
कासार बालकुंदा – परभणी प्रकरणातिल निष्पाप, गरीब कुंटुबातील, होतकरु, सामाजिक कार्य करणारा , संविधान प्रेमी, आदर्श विद्यार्थी सोमनाथ सुर्यवंशी (रामलिंग मुदगड) यांचा पोलिस कोठडीत मृत्यु झाला.ही घटना अमानविय कृत्यातुन झाल्यामुळे आंबेडकरी अनुयायी गावागावातुन निषेध करत आहे .तसेस कासार बालकुंदा येथील अनुयायांनी कालकथित सोमनाथ सुर्यवंशी यांच्या प्रतिमेस हार,पुष्प अर्पण, मेणबत्ती प्रज्वलीत करुण आदरांजली वाहिली.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरणार्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व परभणी प्रकरणातील घटनेसी संबंधित असणारे कर्मचारी यांचा जाहीर निषेध केला.
