• Mon. Apr 28th, 2025

पिळवणूक करणाऱ्या महायुती सरकारला सत्तेवरून खेचा -माजी मंत्री दिलीपराव देशमुख

Byjantaadmin

Nov 16, 2024

पिळवणूक करणाऱ्या महायुती सरकारला सत्तेवरून खेचा -माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची महायुती सरकारवर हल्लाबोल

शिरूर अनंतपाळ  :  राज्यात सत्तेवर असलेल्या महायुती सरकारने व विद्यमान आमदारांनी भ्रष्टाचार करत सामान्य जनतेची मोठ्या  प्रमाणावर पिळवणूक केली असा हल्लाबोल माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी शिरुर अनंतपाळ येथील प्रचारसभेत केला. या भागात लोकांची पिळवणूक थांबवण्यासाठी व विकासाच्या नव्या वाटेवर घेवुन जाण्यासाठी कोंग्रेसचे उमेदवार  अभय साळुंके यांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.या कार्यकृमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते अॅड. संभाजीराव पाटील हे होते.या प्रसंगी खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील,राष्ट्रवादी शरद पवारचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे, निलंगा तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, अल्पसंख्यांक नेते हमीद शेख,

राष्ट्रवादीनेते अॅड. संभाजीराव पाटील, अजीत माने,डॉ. अरविंद भातांब्रे, जयेश माने,प्रभाकर बंडगर,लाला पटेल,व्यंकटराव पाटील, एल.बी. आवाळे,अविनाश रेशमे,राम गायकवाड, भागवत वंगे, अंबादास जाधव, हरिराम कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही 

अभय साळुंके चे वचन 

सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी एका सामान्य कुटूंबातील व्यक्तीला पक्षाचे तिकीट दिले आहे. आपण सर्वांनी मला बहुमताने निवडून द्यावे,मी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या  विश्वासाला पात्र ठरत शिरूर अनंतपाळ तालुक्यातील एमआयडीसी स्थापन करून तरुणांच्या हाताला काम देत तालुक्याचा चौफेरे विकास करेन असे अभय साळुंखे यांनी सांगितले.

 यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील, शिवसेनेचे भागवत वंगे, संजय बिराजदार, रामकिशन गड्डीमे,पी.एस. कदम,पंडीत लवटे,अकबर तांबोळी,रमेश सोनवणे,मधुकर जाधव, जगदिश सुर्यवंशी, पंकज शेळके, मीनाताई बंडले,सुधीर लखनगावे, वैशंपायन जागले, गणेश गुराळे, बसवराज मठपती, बाळासाहेब पाटील,प्रमोद भदरगे,महादेव आवाळे, भरत शिंदे,ज्ञानेश्वर पाटील, शितलताई सोनवणे यांसह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिवर्तनाची लाट…..खासदार डॉ. शिवाजीराव काळगे

महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंखे यांना मतदारांचा वाढता पाठींबा पाहून निलंगा मतदार संघात आता परिवर्तन होणार असल्याचे चित्र असून मला ज्या प्रमाणे लोकसभेत बहुमत दिले, त्याप्रमाणे अभय साळुंके यांना देखील माझ्या सारखे निवडून द्यावे, असे आवाहन खा.डॉ. शिवाजीराव काळगे यांनी मतदारांना केले.

काँग्रेसमध्ये अनेकांचा प्रवेश …भाजपाला खिंडार.

यावेळी माजी जि.प. उपाध्यक्षा अॅड. जयश्रीताई पाटील,शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षा भाग्यश्री देवंगरे, माजी उपनगराध्यक्षा शोभाबाई  व्यंजने,एस.एन.पाटील, विजयकुमार शिरसे,सिद्धलिंग डिगोळे, त्र्यंबक सांगवे, लक्ष्मीबाई येरोळे,हारुबाई दुरुगकर, महानंदा देवंगरे, पवन पाटील, अतुल पाटील, रोहित पाटील, संजय चोपडे कानेगाव यांसह शिरूर अनंतपाळ व तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed