सर्व जाती-धर्माना सोबत घेऊन चालणाऱ्या अमित देशमुख यांना
प्रचंड मताधिकक्याने विजय करा
भाजपाच्या भूलथापांना बळी पडू नका
माजी खासदार सुधाकर शृंगारे यांचे ठिकठिकाणी सभा मधून आवाहन
लातूर प्रतिनिधी-दि.१५ नोव्हेंबर २०२४ (शुक्रवार)
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मविआ आघाडीचे लातूर शहर विधानसभा
मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आ.अमित विलासराव देशमुख यांच्या
प्रचारार्थ शहरातील विविध प्रभागात स्नेह भेटी,नागरिकांशी संवाद तसेच
पदयात्रा होत आहेत ज्याला मतदारातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळत
आहे.
नुकतेच माजी खा.सुधाकर शृंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर शहरातील
प्रभाग ७ मधील बौद्ध नगर या ठिकाणी शहर काँग्रेस सर चिटणीस नितीन कांबळे
यांच्या निवासस्थानी संवाद बैठक संपन्न झाली.या संवाद बैठकीत उपस्थित
मान्यवरांनी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या.
भाजपा जातीवादी पक्ष आहे, सर्वसामान्य तसेच मागासवर्गीयांना तेथे दुय्यम
वागणूक मिळते याचा अनुभव मी घेतला आहे,त्यामुळेच काँग्रेस पक्षात आलो
आहे,असे माजी खासदार सुधाकर शृंगारे याने या बैठकीत बोलताना
सांगितले.लातूरचे काँग्रेस नेतृत्व सर्व जाती धर्मांना एकत्र सोबत घेऊन
चालणारे आहे, लातूरचा जो काही विकास झाला आहे तो काँग्रेसनेच केला
आहे,आ.अमित देशमुख हे नव्या पिढीचे काँग्रेसचे नेतृत्व आहे, त्यांच्याकडे
आधुनिक विकासाचा दृष्टिकोन आहे, आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडे नेता
म्हणून पाहत आहेत,राज्यभरात त्यांच्या सभा होत आहेत, लातूरला अधिक गतीने
पुढे न्यायचे असेल तर आपणाला त्यांच्या पाठीशी शक्ती उभी करावी लागणार
आहे त्यांना अधिक बळ द्यावे लागणार आहे, त्यांना आपण सर्वांनी सर्वाधिक
मताधिक्य दिले तर त्यांच्यावर मोठी जबाबदारी येणार आहे,त्यातून आपल्याला
लातूर साठी मोठमोठ्या चांगल्या योजना येणार आहेत,लातूरचा विकास होणार
आहे,मोठे उद्योग आल्याने रोजगार उपलब्ध होणार आहे, त्यामुळे येत्या २०
तारखेला हाताच्या चिन्हा समोरील बटन दाबून मविआ काँग्रेस पक्षाचे उमेदवार
अमित देशमुख यांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन माजी खासदार सुधाकर
शृंगारे यांनी बैठकीतून केले.दरम्यान लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे
मविआ काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आ.अमित विलासराव देशमुख यांना
प्रचंड अशा मतांनी विजयी करण्याचे आवाहन या संवाद बैठकीस उपस्थित
मान्यवरांनी प्रभागातील नागरिकांना केले.
यावेळी पृथ्वीराज शिरसाट,मोहन माने,डॉ.शिवाजी जवळगेकर,ऍड.अतिष
चिकटे,माजी नगरसेवक युनूस मोमीन,तब्रेज तांबोळी,ऍड.सुमित खंडागळे,करीम
शेख,राजू गवळी,ऍड.गणेश कांबळे,ऍड.अमोल कांबळे, करण गायकवाड,प्रबुद्ध
कांबळे,मागासर्गीय विभाग अध्यक्ष प्रा.प्रवीण कांबळे यांच्यासह या संवाद
बैठकीस प्रभाग क्र.७ मधील आजी माजी नगरसेवक, काँग्रेस पक्षाचे
पदाधिकारी,सदस्य,प्रभागातील महिला भगिनी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
