विकासाची गंगा अविरतपणे वाहती ठेवण्यासाठी महायुतीला साथ द्या आशीर्वाद यात्रेत आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे आवाहन
निलंगा/प्रतिनिधी: केंद्रातील सरकार व राज्यातील महायुतीच्या सरकारने मागील काळात मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत.हा विकास गावागावात पोहोचला आहे.विकासाची ही गंगा अशीच अविरतपणे वाहती ठेवण्यासाठी महायुतीला साथ द्या,असे आवाहन माजीमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.
आ.निलंगेकर यांनी मंगळवारी मतदारसंघात आशीर्वाद यात्रा काढली. साकोळ,शेंद प.,होनमाळ, चांभरगा,बोळेगाव, पांढरवाडी,शेंद उ.,दैठणा, सुमठाणा,डिगोळ येथे या यात्रेच्या माध्यमातून आ.निलंगेकर यांनी नागरिकांशी संवाद साधला.ठिकठिकाणी मतदारांशी बोलताना आ.निलंगेकर म्हणाले की, विरोधक महायुतीने काय केले ? असे विचारत आहेत.विकास झाला नसल्याचा अपप्रचार ते करत आहेत.परंतु सत्ता असताना त्यांनी कोणती विकासकामे केली ? हे विचारण्याची वेळ आता आलेली आहे.विरोधकांनी जनहिताची कामे केली नाहीत. त्यांच्याकडे नियोजन नाही.विकासाची परिभाषा या मंडळींना ठाऊक नाही.स्वतःचे कर्तृत्व नाही.लोकांसाठी तळमळ नाही.असे लोक केवळ अपप्रचाराचा आधार घेत आहेत.या निवडणुकीत विकासाची गंगा आपल्या दारात आणणाऱ्यांना साथ द्यायची की अपप्रचार करणाऱ्यांच्या सोबत जायचे ? याचा निर्णय आपणास करावयाचा आहे.
प्रत्येक उंबरठ्याचा विकास हे ध्येय घेऊन महायुती सरकार काम करत आहे.त्यामुळेच समाजातील सर्व स्तरातील नागरिकांसाठी विविध योजना सरकारने राबवल्या.लाडकी बहीण, प्रधानमंत्री आवास योजना,उज्वला गॅस, एसटी प्रवासामध्ये ५० टक्के सवलतीत प्रवास आदी योजना सरकारने राबवल्या आहेत.याच पद्धतीने जनहिताची आणखी कामे करण्यासाठी आणि विकासाची गंगा अविरतपणे वाहती ठेवण्यासाठी महायुतीला साथ द्या,असे आवाहनही त्यांनी केले.
साकोळ येथून आशीर्वाद यात्रेचा शुभारंभ झाला.यावेळी आ.निलंगेकर यांनी ज्येष्ठ नागरिकांकडून आशीर्वाद घेतले.लाडक्या बहिणींचे आशीर्वाद व तरुणांच्या शुभेच्छाही त्यांनी स्वीकारल्या.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मंगेश पाटील,माजी सभापती गोविंद चिलकुरे, अनिल शिंदे,सचिन भिक्का,नवनाथ डोंगरे, संतोष डोंगरे,महेश डुल्ले, ऋषिकेश बद्दे,भानुदास आवाळे यांची उपस्थिती होती.शेंद येथे मान्यवरांसह माधवराव बिरादार,बापू भिंगे, देविदास माने,अशोक पाटील,राजू मोरे,गणेश मोहिते,राजू जाधव,गणेश सलगरे,विशाल गायकवाड,पंकज रक्षाळे, विजय जागले यांनी यात्रेत सहभाग घेतला.होनमाळ येथे विधानसभा प्रभारी दगडू साळुंके,माजी सभापती धोंडीराम सांगवे,उमाकांत देवंग्रे,शहराध्यक्ष संतोष शेटे,ज्ञानेश्वर चेवले,विनोद शिंदे,मनोज पाटील,ईश्वर बिरादार,सिद्धेश्वर पवार यांची उपस्थिती होती.
