हलगऱ्यातील अल्पसंख्यांक समाजातील युवकांचा भाजपात प्रवेश
निलंगा/प्रतिनिधी:
तालुक्यातील हलगरा येथील अल्पसंख्यांक समाजातील असंख्य युवकांनी माजीमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.आ.निलंगेकर यांच्या नेतृत्वात निलंगा विधानसभा मतदारसंघाचा विकास होत आहे.मागील काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली असून याचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळत आहे. त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांचा भाजपाकडे ओढा आहे.जातीपातींच्या पलीकडे जाते आ. निलंगेकर यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे.विधानसभेच्या प्रचारासाठी आ. संभाजीराव पाटील हलगरा येथे आले असता गावातील अल्पसंख्यांक समाजाच्या असंख्य युवकांनी भाजपात प्रवेश घेतला.
भाजपात प्रवेश घेणाऱ्यांमध्ये जलील इसाक शेख,शेख अहेमद महेताब,विशाल रमेश जाधव,इमाम फकीर मुक्ता,मिरझा अहेमद बंग,सलाउद्दीन सौदागर,अली येरोळे,फयाज सलीम अत्तार,हुसेन गौस खुरेशी,अस्लम फारुख पीरजादे,अल्ताफ बाबुमियां पटेल,विलास रफत अंबेवाले,अलावोद्दीन नजीर अंबेवाले,बालाजी मोतीराम मंत्री,रियाज अयुबसाब चिकले,फकीर अहेमद पीरजादे,सलाओद्दीन जब्बारसाब अंबेवाले यांचा समावेश आहे.आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात काम करत मतदारसंघ आणि तीनही तालुक्यांचा विकास करून घेण्यासाठी आम्ही भाजपात प्रवेश करत असल्याचे या मंडळींनी सांगितले.आ.निलंगेकर यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करत त्यांचा योग्य सन्मान करण्याची ग्वाही दिली.
प्रवेश घेणाऱ्यापैकी जलील इसाक शेख यांना युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष तर सलाउद्दीन जब्बरसाब आंबेवाले यांना युवा मोर्चाचे निलंगा तालुका सरचिटणीस म्हणून नियुक्ती देण्यात आली.यावेळी शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष मंगेश पाटील,प्रशांत मसलगे,मंगेश बिराजदार, प्रकाश बेंडले,महेश मसलगे,सिद्धेश्वर बिराजदार यांच्यासह तालुक्यातील महायुतीचे असंख्य पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती होती.
