महाविकास आघाडीचा विचार लातूरात बळकट करा कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल युनायटेड
नेशन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन व सर्वोच्च न्यायालयाने घेतली
उमेदवार अमित विलासराव देशमुख यांनी गंजगोलाई परिसरातील टिप-टॉप कलेक्शनला दिली भेट
लातूर (प्रतिनीधी) : महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल
युनायटेड नेशन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन व सर्वोच्च न्यायालयाने घेतली
मात्र कोरोना काळात भाजप नेते कटकारस्थान षड्यंत्र रचून त्यांनी महाविकास
आघाडीचे सरकार पाडले. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विचार लातूरात बळकट
करा, या लातूरला आता महाराष्ट्रात काम करण्याची संधी आहे, असे काँग्रेसचे
अधिकृत उमेदवार आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी यांनी गुरुवार दि. ३१
ऑक्टोबर रोजी दुपारी लातूर शहरातील गंजगोलाई परिसरातील मेन रोडवरील सचिन
लोहीया यांच्या टिप-टॉप कलेक्शनला भेट देऊन पाहणी करून दीपावली सणातील
व्यापाऱ्याची उलाढाल आदीसह विविध विषयावर चर्चा करून सर्वांना
दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी ते बोलत होंते..
यावेळी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे
सरचिटणीस मोईज शेख, लातूर रेडिमेड कापड असोसिएशन अध्यक्ष तुकाराम पाटील,
दिनेश इनानी, अभय शहा डी.एन.शेळके, उद्धव पिनाटे, मुकेश जोधवानी, विजय
वर्मा, आनंद मालू, शरद हंचाटे, संजय पतंगे, शेखर मुक्कावार, आप्पा खेकडे,
गोविंद हेड्डा, व्हा. चेअरमन विजय देशमुख, गिरीश ब्याळे, यशपाल कांबळे,
अभिषेक पतंगे, नितीन शेळके, रईस टाके, व्यंकटेश पुरी, सचिन राठोड, आबू
मनियार, राजकुमार शेळके, मुन्ना तळेकर, असलम शेख, सिराज शेख आदीसह
काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी लोहीया कुटुंबीय मित्रपरिवार व्यापारी
उपस्थित होते.
महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार अमित विलासराव देशमुख म्हणाले की,
महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल
युनायटेड नेशन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन व सर्वोच्च न्यायालयाने घेतली
मात्र कोरोना काळात भाजप नेते कटकारस्थान षड्यंत्र रचून त्यांनी महाविकास
आघाडीचे सरकार पाडले. महाविकास आघाडीचा विचार लातूरात बळकट करा, या
लातूरला आता महाराष्ट्रात काम करण्याची संधी आहे, या दिवाळीत लातूरचे
खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रयत्नामुळे लातूर पुणे इंटरसिटी विशेष
रेल्वे सुरू झाली, लातूर शहरात फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचा विरोधक
प्रयत्न करत आहेत, त्यांना कोणीही बळी पडू नये, भारतीय जनता पक्षाला
लातूर शहर विधानसभेत अजूनही उमेदवार सापडत नाहीत, भाजप कार्यकर्त्यांनी
पक्षासाठी आयुष्य झिजवायच आणि उमेदवारी मात्र दुसरेच घेऊन जातात,
महाराष्ट्राची अस्मिता धर्म पाळून महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव प्राप्त
करून देण्याची आता गरज आहे, असे सांगून त्यांनी येत्या 20 नोव्हेंबरला
महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावे
असे आवाहन केले.
ईश्वरप्रसाद जगनाथ डागा व ओमप्रकाश जगनाथ धागा यांच्या गंजगोलाई
परिसरातील कापड लाईन येथील ईश्वरप्रसाद ओमप्रकाश डागा वस्त्र दालनाला
लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास काँग्रेस आघाडीचे अधिकृत
उमेदवार अमित विलासराव देशमुख यांनी भेट देऊन त्यांच्याशी विविध विषयावर
चर्चा केली.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत
उमेदवार अमित विलासराव देशमुख यांनी गंजगोलाई परिसरातील मेन रोडवरील
अक्षय राजकुमार शेळके यांच्या बावरी लेडीज वेअरला भेट दिली तसेच गंजगोलाई
परिसरातील हातगाडे डायफ्रुट विक्रेते, फेरीवाले यांच्याशी संवाद साधला.
———-
