• Tue. Apr 29th, 2025

लातूर ग्रामीण मतदारसंघ हे आमच्यासाठी कुटुंब श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी साधला महिलांशी संवाद

Byjantaadmin

Oct 24, 2024

लातूर ग्रामीण मतदारसंघ हे आमच्यासाठी कुटुंब श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी साधला महिलांशी संवाद

लातूर (प्रतिनीधी) :

 विकासरत्न विलासराव देशमुख हे लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाला आपले कुटुंब मानायचे़ त्यामुळेच ते जे जे नवं ते लातूरला हवं, असे नेहमी म्हणायचे़ त्यांच्या आदर्श विचारावरच आमची वाटचाल सुरु असून आमच्या सर्वांसाठी लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ कुटुंबच आहे़ त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी आपल्या कुटुंबाचे सदस्य असलेले माजी मंत्री आमदार अमित देशमुख व आमदार धिरज देशमुख यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले़.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे़ त्यानिमित्ताने विलास सहकारी साखर कारख्याच्या चेअरम श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी दि. २४ आॅक्टोबर रोजी औसा तालूक्यातील टाका, बिरवली, शिवली, रिंगणी येथे संवाद मेळव्यात महिला मतदाराशी संवाद साधला़ यावेळी सौ. दीपशीखा देशमुख, सुनिताताई अरळीकर, शितलताई फुटाणे, औसा महिला कॉग्रेसच्या अध्यक्ष सईताई गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या पाच वर्षांमध्ये लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी आमदार म्हणून काम करताना मतदारसंघात जास्तीत जास्त विकास योजना आणल्या व त्या योजना ग्रामीण भागातील नागरीकापर्यंत पोहोचविल्या आहेत, असे नमुद करुन श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या, प्रत्येक गोर-गरीब, कष्टकरी, शेतकºयांसाठी विविध योजनेच्या माध्यमातून काम करण्याचा आमदार धिरज देशमुख यांनी प्रयत्न केला आहे. यापुढेदेखील ते लातूर ग्रामीण मतदारसंघात विकासाची कामे खेचून आणतील़, असा विश्वास व्यक्त केला़.

याप्रसंगी संध्याताई कदम, मिराताई शिंदे, लक्ष्मीताई बंडगर, प्रेमनंदा कदम, अश्विनी भांगे, मेघा कदम, सविता शिंदे, संगीता सावंत, सुरेखा सावंत, अनुजा सावंत, मिरा सावंत, मिना सावंत, सुनिता शिंदे, सुनंदा पाटील, कार्तीकी कदम, शोभा कदम, सविता कदम, माणसी कदम, सुनिता गुजरे, मिराबाई कदम, जिजाबाई जाधव, शल्लुबी तांबोळी, नाजूकबी तांबोळी, सुनिता गरड, संगिता गरड, अंजीरबाई गरड, जयाबाई चौगुले, मिनाबाई पाटील, गवळण गुजारे, भागाबाई गुजारे, इंदाबाई गुजारे, संगिताताई साळुके, लिंबाबाई खडके, अचर्णाताई मेंठेकर, अपर्णा क्षीरसागर, गोदावरी क्षीरसागर आदी महिला, पुरुष, कॉग्रेस पक्षाचे कार्यकरते, गावकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed