महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकांचं सत्र एकीकडे सुरु आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील पक्षसंघटनेतील नेत्यांच्या बैठका घेण्याचं काम सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत 40 उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. या उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यानं 40 उमेदवारांची नावं जवळपास निश्चित मानली जात आहेत. मात्र, शिवसेना ठाकरे गटाकडून अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. एबी फॉर्म दिल्यानं संबंधित उमेदवार उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करु शकतात.
शिवसेना ठाकरे गटाकडून एबी फॉर्म वाटप झालेले आणि जवळपास निश्चित असलेल्यांची यादी:
१)सुधाकर बडगुजर(नाशिक पश्चिम)
२)वसंत गिते(nashik मध्य)
३ )अद्वय हिरे (मालेगाव बाह्य)
४)एकनाथ पवार (लोहा कंधार)
५ )के पी पाटील, राधानगरी विधानसभा
६ )बाळ माने, RATNAGIRI विधानसभा
७) उदेश पाटेकर, मागाठाणे विधानसभा
८ )अमर पाटील, SOLAPUR दक्षिण
९) गणेश धात्रक, नांदगाव
१०)दीपक आबा साळुंखे पाटील, सांगोला
११) प्रविणा मोरजकर, कुर्ला
१२) एम के मढवी, ऐरोली
१३) भास्कर जाधव, गुहागर
१४)वैभव नाईक, कुडाळ
१५) राजन साळवी, राजापूर लांजा
१६) आदित्य ठाकरे, वरळी
१७) संजय पोतनीस, कलिना
१८) सुनील प्रभू, दिंडोशी
१९) राजन विचारे, THANE शहर
२०) दीपेश म्हात्रे, डोंबिवली
२१) कैलास पाटील, DHARASHIV
२२) मनोहर भोईर, उरण
२३) महेश सावंत, माहीम
२४)श्रद्धा जाधव, वडाळा
२५) पाचोरा – वैशाली सूर्यवंशी
२६) नितीन देशमुख – बाळापूर
२७) किशनचंद तनवाणी – छत्रपती संभाजी नगर मध्ये
२८)SAMBHAJINAGAR पश्चिम – राजू शिंदे*
२९)वैजापूर मतदारसंघ – दिनेश परदेशी*
३०) कन्नड मतदारसंघ – उदयसिंह राजपूत*
३१) सिल्लोड मतदारसंघ – सुरेश बनकर
३२) राहुल पाटील -PARBHANI

३३) शंकरराव गडाख -नेवासा
३४) सुभाष भोईर – कल्याण ग्रामीण
३५) सुनील राऊत – विक्रोळी
३६) रमेश कोरगावकर भांडुप पश्चिम
३७) उन्मेश पाटील – चाळीसगाव
३८) स्नेहल जगताप – महाड
३९) ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व
४०) केदार दिघे- कोपरी पाचपाखाडी
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडावेळी पक्ष सोडून न जाता सोबत असलेल्या बहुतांश आमदारांना एबी फॉर्म दिले आहेत. मविआच्या जागावाटपाची घोषणा झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.