अंबुलगा येथीलआशा स्वंयसेविका,अंगणवाडी सेविका,मदनिस,प्रेरीका यांचा माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सन्मान
निलंगा(प्रतिनिधी):-निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु येथील आशा स्वयंसेविका, सुपरवायजर,सीआरपी,अंगणवाडी सेविका/ मदतनीस प्रेरीका यांचा माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान सोहळा सपन्न झाला…या सन्मान सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर या होत्या.तर प्रमुख पाहूणे माजी पंचायत समिती सदस्य सुभाष म्हेञे वामनराव भालके,चेअरमन अरविंद चव्हान,माधवराव पाटील,नरशिंग म्हेञे,दिलीप मिरगाळे,धोंडाबाई बिरादार,संगीता आंबेगावे,भानुदास होरे,शेखर मिरगाळे,चक्रधर बिरादार,बालाजी म्हेञे,शिवशंकर मिरगाळे,लालू शेख, मारूती कांबळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस / प्रेरीका आदीना प्रमाणपत्र, देऊन गौरवण्यात आले.या प्रसंगी आ.निलंगेकर यांनी कोविड काळातील आशा, अंगणवाडी सेविका यांचे अमूल्य योगदान, लाडक्या बहिण योजनेबाबत चा सक्रिय सहभाग आदींचा आवर्जून उल्लेख करूनसर्व सेविकांना राष्ट्रसेविका अशी उपाधी दिली. तसेच माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यानी सर्व उपस्थित महिला कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले…या सन्मान सोहळ्यात अंबुलगा बु गावच्या सरपंच संगीता पाञे,तोतन जमादार व त्यांच्या पत्नी यानी भाजपात प्रवेश केला.दत्ता सुर्यवंशी,ज्ञानेश्वर सुर्यवंशी,मुकेश सुर्यवंशी,अमोल सुर्यवंशी,या तरूणानी गावातील कामगार योजनेचे विनामुल्य अर्ज भरून वेद्य करून योजना सक्षमपणे राबविल्यामुळे त्यांचाही सन्मान करण्यात आला आहे.
