भाजपाला सोडचिठ्ठी देत गंगासिंह कदम यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
लातूर/ प्रतिनिधी
लातुर ग्रामीणचे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत पोहरेगावचे माजी सरपंच गंगासिंह कदम यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत विजयादशमीच्या मुहुर्तावर अखिल भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसमध्ये केला प्रवेश केला. धिरज देशमुख यांनी त्यांचे स्वागत करून पक्ष कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
बाभळगाव येथे झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड प्रमोद जाधव, रेणा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, लालासाहेब चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अभय साळुंके, सेवा दल कॉग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश सुर्यवंशी, चेअरमन माणिकराव सोमवंशी, कृउबाचे संचालक अशोक रामराव राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
