• Tue. Apr 29th, 2025

समतेचा सर्वधर्मसमभावाचा फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार घेऊन आपणाला पुढे जायचे आहे-माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

Byjantaadmin

Apr 1, 2024

समतेचा सर्वधर्मसमभावाचा फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार घेऊन आपणाला पुढे जायचे आहे पदाधिकाऱ्यांनी काम प्रामाणिकपणे व नियोजनबद्ध करावे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख लातूर  शहरातील प्रभाग क्रमांक १०,११,१२,१३ मधील पदाधिकारी बैठक संपन्न.



प्रतिनिधी : मेरा बूथ तीनशे पार प्लस असा निर्धार प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावा  हा निर्धार पूर्ण करण्यासाठी प्रचारकाळात कोणीही वेळ वाया घालू नये. लातूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना मतदारांपर्यंत घेऊन जावे. प्रतिगामी शक्तींच्या विरोधात आपण हजारो वर्ष लढलो, समतेचा सर्वधर्मसमभावाचा फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार घेऊन आपणाला पुढे जायचे आहे. या विचारासाठी आता डॉ. शिवाजी काळगे यांना विजयी करावे, असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले. सोमवार दि. १ एप्रिल रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरातील प्रभाग क्रमांक १०,११,१२,१३ मधील पदाधिकरी, कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे, माजी महापौर दीपक सुळ, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, राजाभाऊ काळे, माजी नगरसेवक सचिन बंडापल्ले, प्रा प्रवीण कांबळे, पप्पू
देशमुख, आयुब मणियार, नागसेन कामेगावकर, दत्ता सोमवंशी, कांचनताई अजनीकर काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक १० अध्यक्ष रत्नदीप अजनीकर, प्रभाग 11 अध्यक्ष विकास वाघमारे, प्रभाग 12 अध्यक्ष सूर्यकांत कातळे, हरिओम भगत,
प्रवीण सूर्यवंशी दीपक राठोड, आकाश भगत, गोटू यादव, महादेव बरुरे  आदींसह लातूर शहरातील प्रभाग क्रमांक १०,११,१२,१३ मधील सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
  योवळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की,  लातूर शहरातील पश्चिम भागातील प्रभाग क्रमांक 10 11 12 13 मधील बारकावे आपण समजून घेतले पाहिजेत, मतदानाची टक्केवारी ही आपणाला वाढवायची आहे. भारतातील राज्यातील सध्याची परिस्थिती आपणाला बदलावयाची आहे. लातूरकरांनी मला तीनदा विधानसभेत प्रतिनिधित्व  करण्याची संधी दिली,  असेच आपले काम रामाणिकपणे व नियोजनबद्ध करावे आणि काँग्रेस पक्षाचे मुद्दे मतदारापर्यंत पोहोचवावेत असे त्यांनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, या लोकसभेला निवडणूकीत आपण सर्वांनी केलेले काम विधानसभेला, महानगरपालिकेच्या निवडणुकीला उपयोगी पडेल, देशात इंडिया आघाडीचा जोर वाढलेला आहे, महाविकास आघाडी ही राज्यात व मराठवाड्यात महायुतीपेक्षा लोकसभेच्या जास्त जागा जिंकेल, आपणाला लढून जिंकायचे आहे, ही खुणगाठ रत्येकाने उराशी बाळगावी. लातूर शहरातून आपणाला लोकसभेला लाखाची लीड द्यायची आहे, त्यासाठी आजपासून या क्षणापासून प्रत्येकाने कामाला लागावे असे ते म्हणाले ते म्हणाले. आमदार आपले आहेतच खासदारही आपला असावा 1999 साली लोकनेते विलासराव देशमुख  ८२००० मताधिक्यांनी निवडून आले, महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्य त्यांना होते, त्यावेळेला ते राज्याचे मुख्यमंत्री  झाले, लातूर लोकसभेत डॉक्टर विरुद्ध कंत्राटदार अशी लढत आहे, डॉक्टर रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून काम करतात,कंत्राटदार निविदासेवा हीच ईश्वर सेवा असे करतो. विज्ञान विरुद्ध अज्ञान दृष्टीहीन विरुद्ध दृष्टीदाता अशी निवडणूक होत आहे असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे म्हणाले की, लातूर लोकसभेची निवडणूक कुठल्याही परिस्थितीत आपणाला जिंकायची आहे. ही निवडणूक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या जीवावरच आपण जिंकणार आहोत, प्रत्येकाचा
प्रभाब, बूथ जिंकलाच पाहिजे, महाराष्ट्रात परत एकदा महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे हेच लातूर लोकसभेची निवडणूक जिंकणार आहेत अशी लोकांमध्ये चर्चा आहे, भाजप सरकारने
देशात केलेली महागाई बेरोजगारी जीएसटीने व्यापाऱ्यावर केलेला अत्याचार सर्वांनी मतदारापर्यंत पोहोचवावा. भाजपला संविधान बदलावयाच आहे असे सांगीतले. या बैठकीचे प्रास्ताविक प्रा प्रविण कांबळे यांनी केले तर बुथप्रमुखांनी मनोगत व्यक्त केले या बैठकीचे शेवटी आभार दत्ता सोमवंशी यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed