• Tue. Apr 29th, 2025

देशात अघोषित आणीबाणी-शरद पवार

Byjantaadmin

Apr 1, 2024

मुंबई : देशात अघोषित आणीबाणी आहे. एक मुख्यमंत्री तुरुंगात आहे व इतर अनेकांना अशाच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यामुळे एकजुटीने या परिस्थितीचा सामना करायचा आहे, असे माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार यांनी शनिवारी येथे एका इफ्तार मेळाव्यात बोलताना सांगितले.

ते म्हणाले की, की, शांतता आणि बंधुता नांदावी यासाठी देशाच्या संविधानाचे रक्षण करणे आवश्यक आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) काही लोक राज्यघटनेत बदल करण्याबाबत नियमितपणे बोलत आहेत. अशा टिप्पण्या चिंताजनक आहेत. ज्या देशात शांतता असेल तेथे घाबरण्याची आवश्यकता नाही. शेजारी राष्ट्रांमध्ये असलेल्या सरकारने व्यक्तीसाठी लोकशाही नष्ट केली असल्याचे सांगत पवार म्हणाले ती, अशा प्रकारची स्थिती आपल्या देशात कधीही निर्माण होता कामा नये. शांतता आणि बंधुत्वासाठी, आपण संविधानाचे रक्षण केले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेले शिवसेना (उबाठा) नेते अरविंद सावंत आणि मुंबई काँग्रेसच्या प्रमुख वर्षा गायकवाड या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. विशेष म्हणजे, भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते की, त्यांच्या पक्षाला संविधानात सुधारणा करण्यासाठी आणि काँग्रेसने केलेल्या विकृती आणि अनावश्यक जोडण्या दुरुस्त करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता आहे. भाजपने नंतर हेगडे यांच्या वक्तव्यामुळे उफाळून आलेला वाद मिटवण्यासाठी पुढे सरसावत त्यांनी ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगितले होते आणि त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed