शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांच्या हस्ते निलंग्यात पदनियुक्त्या व रॅली
निलंगा- लातूर जिल्ह्यात शेतकरी संघटना सक्रिय झाली असून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आक्रमक भूमिका घेत आहे. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत निलंगा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हलकीच्या कडकडाटात भव्य रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच महात्मा गांधी हायस्कुल येथे झालेल्या बैठकित निलंगा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी शाहूराज लोभे यांची युवा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर गव्हाणे सर यांची ज्येष्ठ तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुरेंद्र अंबुलगे, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मिथुन दिवे, गजानन बोळंगे यांनी उपस्थिती पदाधिकारी, कार्यकत्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन दत्ता शिंगडे यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित संजीव गव्हाणे, शाहूराज लोभे, मेघराज रणखांब, आदित्य लोभे, हणमंत पाटील, तिरुपती येळकर, महादेव लादे, गणेश सिरसले, एकनाथ खडगावे, प्रमोद पवार, भागवत बिरादार, विजय बाबळसुरे, प्रशात सूर्यवंशी, मुरली बोंडगे, किरणकुमार जाधव, कमलाकर वारगले, दत्ता सातपुते, हरिभाऊ मंजुळे, योगेश मुळे, गोविंद शेळके, चक्रधर कावळे, वसंत जगताप, ओमकार शेळके, मिथुन राठोड, तुळशीदास पाटील , संजय देवाप्पा, उपस्थित होते.तर मिथुन दिवे यांनी आभार मानले. व मराठवाडा अध्यक्ष जिवणे सर यांनी मार्गदर्शन केले.
