• Sat. May 3rd, 2025

नरेंद्र मोदींची टीम म्हणजे वसूली टायटन्स, भारतीय क्रिकेटरच्या पोस्टने सर्वत्र खळबळ…

Byjantaadmin

Mar 29, 2024

नवी दिल्ली : भारतामध्ये सध्याच्या घडीला आयपीएल आणि लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरु आहे. पण यामध्ये सध्या भारतीय क्रिकेटरी पोस्ट चांगलीच गाजत आहे. कारण या पोस्टमध्ये नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळाला वसूली टायटन्स, असे या क्रिकेटने संबोधले आहे.

आयपीएलमध्ये गुजरातचा संघ आहे. या संघाचे नाव गुजरात टायटन्स, असे आहे. यापूर्वी हार्दिक पंड्या या संघाचा कर्णधार होता, पण या वर्षापासून शुभमन गिलकडे गुजरातच्या संघाने कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. नरेंद्र मोदी हे गुजरातचेच आहेत. दुसरीकडे निवडणुकांचे वारे वाहायला सुरुवात झाली असल्यामुळे आरोपांच्या फैरीही सुरु झाल्या आहेत. त्यामध्येच नरेंद्र यांच्या मंत्री मंडळाला यावेळी वसूली टायटन्स असे नाव, भारताच्या एका क्रिकेटरने दिले आहे.महिला भारतीय क्रिकेट संघातील सर्वात आश्वासक खेळाडूंपैकी एक असलेल्या पूजा वस्त्राकरने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा आणि इतर भाजप नेत्यांची खिल्ली उडवणारी ‘वसूली टायटन्स’ नावाची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली. त्यानंतर भारतामध्ये एकच खळबळ उडाली आहे. कारण पुजा ही भारताची एक चांगली क्रिकेटपटू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तिने दमदार कामगिरी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती प्रकाशझोतात आली आहे. पण पूजाने ही पोस्ट नेमकी का केली, याचे कारण अजूनही समजलेले नाही. कारण पूजा ही आपला खेळ बरा आणि आपण, अशी स्वभावाची आहे. त्यामुळे एकिकडे आयपीएल सुरु असताना राजकीय पोस्ट पूजाने का केली, हा प्रश्न आता क्रिकेट चाहत्यांना पडलेला आहे.भारतामध्ये आयपीएलचा रंग चांगलाच चढत असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीपासूनच आयपीएल हे प्रकाशझोतात आले आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवार जाहीर केले जात आहे. त्यामुळे भारतामधील लोकांचे लक्ष हे आयपीएल आणि निवडणुकांकडे लागलेले आहे. या दोन्हींचा मेळ या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे.पूजाने ही पोस्ट केल्यावर ती चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर पूजाने ही इंस्टाग्रामवरची पोस्ट परत घेतल्यचे पाहायला मिळत आहे. पण तिच्या या पोस्टचे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले आहेत. या पोस्टबद्दल आता पूजा नेमकं काय बोलते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *