• Thu. Jun 26th, 2025

अखेर ठरलं! अर्चना पाटील चाकूरकर भाजपमध्ये प्रवेश करणार

Byjantaadmin

Mar 29, 2024

लातूर : २०१९ पासून अर्चना पाटील चाकूरकर या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा लातूर जिल्ह्यात होत आहेत. मात्र आज अर्चना पाटील चाकूरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले असल्याचे समजत आहे. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई अर्चना चाकूरकर या भाजपच्या वाटेवर आहेत. या भेटीनंतर त्यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बसवराज पाटील यांच्यापाठोपाठ अर्चना पाटील चाकूरकर या देखील भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे मराठवाड्यातून भाजपात प्रवेश करणाऱ्या या नेतेमंडळीमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. एकेकाळी मराठवाडा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र या नेत्याच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यातील नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मराठवाड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती.त्यानंतर काही दिवसांनी शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र माजी राज्यमंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांनीही भाजपात प्रवेश केला. येत्या काळात काँग्रेसमध्ये फक्त देशमुख गटाचे वर्चस्व मराठवाड्यात असणार आहे. त्यामुळेच अर्चना पाटील चाकूरकर यांनी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. आगामी विधानसभा निवडणुकीत लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून त्या लढण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा होत आहेत. याबाबत आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मध्यस्थी करून हा प्रवेश निश्चित केल्याच्या चर्चा जिल्हाभरात होत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *