• Thu. May 15th, 2025

आयएमएच्या वर्ष २०२५ -२६ साठी प्रेसिडेंट इलेक्ट म्हणून रेडिओलॉजिस्ट डॉ.अभय कदम यांची निवड 

Byjantaadmin

Mar 27, 2024

आयएमएच्या वर्ष २०२५ -२६ साठी प्रेसिडेंट इलेक्ट म्हणून रेडिओलॉजिस्ट डॉ.अभय कदम यांची निवड 

लातूर : इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमए लातूर च्या वर्ष २०२५ – २६ साठी प्रेसिडेंट इलेक्ट म्हणून लातूरचे ख्यातनाम रेडिलॉजिस्ट डॉ.अभय कदम यांची निवड करण्यात आली आहे. आयएमए लातूर शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. २६ मार्च २०२४ रोजी आयएमए सभागृहात पार पडली. या सभेत प्रेसिडेंट इलेक्ट म्हणून डॉ. अभ्या कदम यांची एकमताने बिनविरोध  निवड करण्यात आली. या निवडीसोबतच वर्ष २०२४ -२५ या वर्षासाठीइतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.  त्यामध्ये उपाध्यक्ष डॉ.अशोक पोद्दार,सचिव डॉ. गणेश बंदखडके, कोषाध्यक्ष डॉ. संगमेश  चवंडा ,, सहसचिव डॉ. घनश्याम दरक्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. 

ही सभा आयएमए निवडणूक आयोगाचे डॉ.अशोक आरदवाड , डॉ. रमेश भराटे , डॉ. अजय जाधव, डॉ. विश्वास कुलकर्णी, आयएमएचे मावळते अध्यक्ष डॉ. अनिल राठी, विद्यमान अध्यक्ष डॉ. उमेश कानडे,सचिव डॉ. आशिष चेपूरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या निवडीमागे डॉ. गिरीश मैंदरकर, डॉ. दीपक गुगळे, डॉ.अशोक पोद्दार, डॉ.संदीप कवठाळे ,डॉ.अमीर शेख, डॉ. चेतन सारडा, डॉ. राजकुमार दाताळ ,डॉ. संजय वारद ,डॉ. पी.बी. कुलकर्णी, डॉ. हर्षवर्धन राऊत,यांचे विशेष सहकार्य लाभले. 

   नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल  माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील,  डॉ. एस.एन.  जटाळ , डॉ.अविनाश देशमुख, डॉ. सुरेखा निलंगेकर,डॉ. सुरेखा काळे, डॉ. कल्याण बरमदे, डॉ. हणमंत किनीकर ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले ,अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते,वैद्यकीय अधीक्षक डॉ. भालेराव,आरोग्य उपसंचालक डॉ.अर्चना भोसले, डॉ. शिवाजी काळगे ,डॉ. संजय  शिवपूजे , डॉ. अशोक गाणू , डॉ. किरण गोजमगुंडे, डॉ. संजय भोसले,डॉ. बाळासाहेब जाधव, डॉ. संतोष हिंडोळे ,डॉ. प्रशांत कापसे, डॉ. कलमे, डॉ. देवणीकर ,डॉ.सुधाकर बिराजदार,डॉ.शिवलिंग शेटे, डॉ. मनोज कदम, डॉ. महेंद्र सोनवणे ,डॉ. श्यामसुंदर पाटील, डॉ. उल्हास महाजन यांसह  सर्व तज्ज्ञ डॉक्टरांनी अभिनंदन केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *