तगरखेडा येथील भुमिपुत्र दिपक पाटील बनले नॅशनल कोच
निलंगा (प्रतिनिधी)निलंगा तालुक्यातील मौजे तगरखेडा येथील भुमिपुत्र असलेले दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक
हॉलीबॉल खेळाडु दर्जेदार बनवून तगरखेडा गावाला हॉलीबॉल खेळाडुचे गाव म्हणुन नावलौकिक मिळवण्यासाठी मोठे योगदान देणारे दिपक पाटिल यांची आता नॅशनल कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे .
याविषयी सविस्तर माहिती अशी की, पन्ना,(मध्यप्रदेश) येथे दिनांक १६ ते २१ दरम्यान होणाऱ्या युथ नॅशनल हॉलीबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी साठी तगरखेडा ता.निलंगा येथील दिपक व्ही.पाटील यांना नॅशनल कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्ती बद्दल महाराष्ट्र हॉलीबॉल आसोशिएशन आध्यक्ष प्रतीक जयंत पाटील महाराष्ट्र हॉलीबॉल असोसिएशन चे सचिव विरल शाह , लातूर जिल्हा आसोसिशन सचिव प्रा. डी. डी. हांडे , लातूर विभगीय सचिव प्रा.विजय डी. हांडे सर यांनी आभिंनदन केले.