माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची धाराशिवचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली बाभळगाव निवासस्थानी सदिच्छा भेट.
लातुर प्रतिनिधी- राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची आज मंगळवार दि. २६ मार्च रोजी सायंकाळी धाराशिवचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सदिंच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात लोकसभा निवडणूक २०२४ अनुषंगाने विविध महत्वपूर्ण विषयावर चर्चा पार पडली. यावेळी लातुर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांची उपस्थित होती.
