• Thu. May 15th, 2025

राजा बोले आणि दाढी हाले असं होणार नाही, ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकूमशाही, प्रतिभा धानोरकरांचा मुनगंटीवारांवर पहिला हल्ला

Byjantaadmin

Mar 25, 2024

चंद्रपूर : (Chandrapur Lok Sabha Election 2024 Congress) उमेदवारी मिळवल्यानंतर प्रतिभा धानोरकर नागपुरात दाखल झाल्या. नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांनी प्रतिभा धानोरकरांचं भव्य स्वागत केलं. यावेळी बोलताना प्रतिभा धानोरकरांनी सुधीर मुनगंटीवारांवरपहिला हल्ला चढवला. ही लढाई सोपी नाही. लोकशाही विरूद्ध हुकुमशाही अशी लढाई आहे, असं प्रतिभा धानोरकर म्हणाल्या. तसेच, राजा बोले आणि दाढी हाले असं अजिबात होणार नाही, असंही प्रतिभा धानोरकर म्हणाल्या आहेत. दरम्यान, चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, त्यांच्यासोबतच विजय वडेट्टीवार आणि शिवानी वडेट्टीवार यांचीही नावं चर्चेत होती. मात्र, दिल्ली हायकमांडनं प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. 

काँग्रेस नेत्या प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, “2019 च्य्या निवडणुकीत असाच संघर्ष बाळू धानोरकर यांना करावा लागला होता. दहा महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं. त्यानंतर ही जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली. याला मी नक्की सर करेन. माझी जबाबदारी मी यशस्वी पार पाडेल. मला उमेदवारी दिल्यानं महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील नेत्यांचे आभार.”

जितना संघर्ष ज्यादा होगा, जीत उतनी शानदार होगी : प्रतिभा धानोरकर 

“मात्तबर मंत्री अशी ओळख असलेले मुनगंटीवार माझ्या विरोधात असल्यानं माझी ही लढाई हवी तेवढी सोपी नाही, त्यांना राजकारणच दांडगा अनुभव आहे. माझ्यासाठी ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी आहे. संघर्ष केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. मी एक स्टेटस ठेवला होता, जितना संघर्ष ज्यादा होगा जीत उतनी शानदार होगी. भारतीय जनता पक्ष हा हुकूमशाही पद्धतीनं चालणारा पक्ष आहे. राजा बोले तैशी दाढी हाले, अशी परिस्थिती पक्षाची आहे.”, असं काँग्रेस नेत्या प्रतिभा धानोरकर म्हणाल्या आहेत. 

त्यांना उमेदवारी मिळाली असती, तर मी आदेश फॉलो केले असते : प्रतिभा धानोरकर 

“आमचा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालणार आहे. संविधानात सांगितलं की, प्रत्येकाला दावेदारी करण्याचा नैतिक अधिकार आहे. आमची लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी आहे. त्यामुळे सगळे एकत्र येऊन काम करतील. आमचा पक्ष संविधान आणि लोकशाहीवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे पक्षाचं जे काही ध्येय-धोरण असेल, त्यानुसार त्यांना (वडेट्टीवार) उमेदवारी मिळाली असती. तर मी आदेश फॉलो केले असते. मला उमेदवारी मिळाली तर ते पक्षाचे आदेश फॉलो करतील. ही आमची सगळ्याची लढाई असल्याने तळागाळातील सगळे पदाधिकारी एकत्र येऊन ही निवडणूक आम्ही लढू. विरोधी पक्षनेते म्हणून मी त्यांना (वडेट्टीवार) निमंत्रण देईल आणि ते येतील असा विश्वास आहे.”, असं काँग्रेस नेत्या प्रतिभा धानोरकर म्हणाल्या आहेत. 

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसची उमेदवारी मिळवल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांचा आज नागपुरात आगमन झालं. गेले अनेक दिवस उमेदवारीसाठी दिल्लीत तळ ठोकून पक्षांतर्गत स्पर्धकांशी संघर्ष करणाऱ्या प्रतिभा धानोरकर यांचं स्वागत करण्यासाठी चंद्रपुरातून त्यांचे काही निवडक कार्यकर्ते NAGPUR विमानतळावर दाखल झाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर यांचे दिवंगत पती बाळू धानोरकर यांनी विजय मिळवला होता. त्या निवडणुकीत पूर्णMAHARASHTRA तून बाळू धानोरकर हेच एकमेव काँग्रेस खासदार निवडून आले होते. बाळू धानोरकरांच्या निधनानंतर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली नव्हती. तेव्हापासूनच चंद्रपूरची जागा रिकामी होती. बाळू धानोरकरांचा वारसा पुढे नेण्यासाठीच प्रतिभा धानोरकरांनीCHANDRAPUR तून उमेदवारी मागितली होती. आता त्यांचा सामना भाजपचे दिग्गज नेते तसेच वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी होणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *